mr_ta/translate/figs-extrainfo/01.md

6.3 KiB

वर्णन

कधीकधी गृहीत ज्ञान किंवा अंतर्भूत माहिती स्पष्टपणे न सांगणे चांगले. हे केव्हा करू नये याबद्दल हे पृष्ठ काही दिशा देते.

भाषांतर तत्त्वे

  • एखाद्या वक्त्याने किंवा लेखकाने जाणूनबुजून काहीतरी अस्पष्ट ठेवल्यास, ते अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू नका.
  • जर मूळ श्रोत्यांना वक्त्याचा अर्थ समजला नसेल तर ते इतके स्पष्ट करू नका की तुमच्या वाचकांना ते विचित्र वाटेल जे मूळ श्रोत्यांना समजले नाही.
  • तुम्हाला काही गृहीत ज्ञान किंवा अंतर्भूत माहिती स्पष्टपणे सांगायची असल्यास, ते अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्या वाचकांना असे वाटणार नाही की मूळ प्रेक्षकांना त्या गोष्टी सांगण्याची गरज आहे.
  • जर संदेश गोंधळात टाकत असेल किंवा मुख्य मुद्दा काय आहे ते वाचकांना विसरायला लावत असेल तर अस्पष्ट माहिती स्पष्ट करू नका.
    • तुमच्या वाचकांना आधीच समजले असेल तर गृहीत ज्ञान किंवा अंतर्भूत माहिती स्पष्ट करू नका.

बायबलमधील उदाहरणे

भक्षकातून भक्ष्य; उग्रातून मधुर (शास्ते 14:14 युएलटी)

हे एक कोडे होते. शमशोन हे जाणूनबुजून अशा प्रकारे बोलला की त्याचा काय अर्थ आहे हे त्याच्या शत्रूंना कळणे कठीण जाईल. हे स्पष्ट करू नका की खाणारा आणि मजबूत गोष्ट हा सिंह होता आणि खायला गोड गोष्ट मध होती.

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा." तेव्हा ते आपापसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून तो असे म्हणत आहे.”... (मत्तय 16:6,7 युएलटी)

येथे संभाव्य अर्थपूर्ण माहिती आहे की, परूशी आणि सदूकी यांच्या चुकीच्या शिकवणुकींपासून शिष्यांना सावध राहावे. पण येशूंच्या शिष्यांना ते समजले नाही. त्यांना वाटले की येशू खरे खमीर आणि भाकरी याविषयी बोलत होता. म्हणून "खमीर" हा शब्द येथे खोट्या शिकवणुकीचा उल्लेख आहे हे स्पष्टपणे सांगणे योग्य ठरणार नाही. येशूने मत्तय 16:11 मध्ये जे म्हटले ते ऐकल्यावर शिष्यांना समजत नव्हते.

मी भाकरी विषयी तुम्हांला बोललो नाही, हे तुम्हांला कसे समजत नाही?” परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा: तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते, पण परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते. (मत्तय 16:11,12 .युएलटी)

येशूने फक्त भाकरीचा विषय सांगितला नाही हे स्पष्ट केल्यानंतर त्यांना समजले की तो परुश्यांच्या खोटया शिकवणुकीबद्दल बोलत होता. म्हणून मत्तय 16: 6 मध्ये परिपूर्ण माहिती स्पष्टपणे सांगणे चुकीचे आहे.

भाषांतर रणनीती

आम्ही शिफारस करतो की अनुवादकांनी अधिक स्पष्ट करण्यासाठी या प्रकारचा उतारा बदलू नये, या पृष्ठावर कोणतीही भाषांतर धोरणे नाहीत.

लागू केलेल्या भाषांतर धोरणांची उदाहरणे

आम्ही शिफारस करतो की अनुवादकांनी अधिक स्पष्ट करण्यासाठी या प्रकारचा उतारा बदलू नये, या पृष्ठावर कोणतेही भाषांतर धोरण लागू केलेले नाही.