mr_ta/translate/figs-exclamations/01.md

11 KiB

वर्णन

उद्गार हे शब्द किंवा वाक्ये आहेत जे तीव्र भावना जसे आश्चर्य, आनंद, भय किंवा क्रोध यास दर्शवितात. युएलटी व युएसटीमध्ये, सहसा त्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह (!) असतात. चिन्ह दर्शवते की हा उद्गार आहे. लोकांनी काय म्हटले त्याबद्दलची परिस्थिती आणि त्याचा अर्थ ते कोणत्या भावना व्यक्त करतात हे आम्हाला समजण्यास मदत करतो. मत्तय ८ मधील खाली दिलेल्या उदाहरणामध्ये, वक्ते अतिशय भयभीत झाले आहेत. मत्तय ९ मधील उदाहरणामध्ये, वक्ते आश्चर्यचकित झाले आहेत, कारण त्यांना अगोदर कधीही पाहीले नव्हते असे काहीतरी घडले.

प्रभुजी, आम्हांला वाचवा, आम्ही बुडत आहोत.” (मत्तय ८:२५ युएलटी)

जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो पुरुष बोलू लागला. लोकांना याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही पाहण्यात आले नाही.” (मत्तय ९:३३ युएलटी)

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

वाक्यातून तीव्र भावना संप्रेषित होते हे दर्शविण्यासाठी भाषांमध्ये वेगवेगळे मार्ग आहेत.

बायबलमधील उदाहरणे

काही उद्गारामध्ये असे शब्द आहेत जे भावनेला दर्शविते. खालील वाक्यांमध्ये "अहाहा" आणि "हाय" आहेत. "अहाहा" हा शब्द येथे वक्त्याचे आश्चर्य दाखवते.

अहाहा, देवाच्या बुध्दी व ज्ञान यांची संपत्ती किती अगम्य आहे ! (रोम. ११:३३ युएलटी)

खाली दिलेला शब्द "हाय" हा गिदोन अतिशय भयभीत होता यास दर्शवितो.

जेव्हा गिदोनाने पाहीले की हा परमेश्वराचा दूत होता तेव्हा गिदोनाने विलाप केला, "हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पहिला आहे!" (शास्ते ६:२२ युएलटी).

काही उद्गार जरी ते प्रश्न नसतात तरी "कसे" किंवा "का," या प्रश्नांच्या शब्दाने सुरू होतात . खाली वाक्यातून असे दिसून येते की देवाचे निर्णय किती गहण आहेत याविषयी वक्ता आश्चर्यचकित झाला आहे.

त्याचे निर्णय किती गहण आहेत, व त्याचे मार्ग अगम्य आहेत (रोम ११:३३ब युएलटी)

बायबलमधील काही उद्गारांमध्ये मुख्य क्रियापद नसतात. खाली उद्गार असे दर्शविते की वक्ता ज्याच्याशी बोलत आहे त्याचा तिरस्कार करतो.

अरे मूर्ख व्यक्ती! (मत्तय ५:२२ युएलटी)

भाषांतर पध्दती

(१) जर आपल्या भाषेत एखाद्या उद्गारामध्ये एका क्रियापदाची आवश्यकता असल्यास, एक क्रियापद जोडा. बऱ्याचदा चांगले क्रियापद "आहे" किंवा "आहेत" हे आहेत.

(२) तीव्र भावना दर्शविणारे आपल्या भाषेतील उद्गारवाचक शब्दाचा उपयोग करा.

(३) भावना दर्शविणाऱ्या वाक्यासह उद्गारवाचक शब्दाचे भाषांतर करा.

(४) अशा शब्दांचा वापर करा जे वाक्याच्या भागावर जोर देतील ज्याद्वारे तीव्र भावना उत्पन्न होतील.

(५) जर लक्षीत भाषेत तीव्र भावना स्पष्ट नसल्यास, तर त्या व्यक्तीला कसे वाटले हे सांगा.

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण

(१) जर आपल्या भाषेत एखाद्या उद्गारामध्ये एका क्रियापदाची आवश्यकता असल्यास, एक क्रियापद जोडा. बऱ्याचदा चांगले क्रियापद "आहे" किंवा "आहेत" हे आहेत.

अरे तू मुर्ख मनुष्या ! (मत्तय ५:२२ब युएलटी)

“तू एक मुर्ख व्यक्ती आहेस!”

अहाहा, देवाच्या बुध्दीची व ज्ञानाची संपत्ती किती अगम्य आहे ! (रोम ११:३३ब युएलटी)

“अहाहा, देवाच्या बुध्दीची व ज्ञानाची संपत्ती खुप अगम्य आहे!”

(२) तीव्र भावना दर्शविणारे आपल्या भाषेतील उद्गारवाचक शब्दाचा उपयोग करा. खाली प्रथम सुचविलेल्या भाषांतरात, “वाह” हा शब्द दर्शवितो की ते चकित झाले होते. दुसर्‍या सुचविलेल्या भाषांतरात “अरे नाही” ही अभिव्यक्ती दाखवते की काहीतरी भयंकर किंवा भयानक घडले आहे.

ते फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयासही लावतो.” (मार्क ७:३७ युएलटी)

ते फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, 'वाह! त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयासही लावतो.”

हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराच्या दूतास मी प्रत्यक्ष पहिले आहे!" (शास्ते ६:२२ब युएलटी).

अरे नाही, प्रभु परमेश्वरा! परमेश्वराच्या दूतास मी प्रत्यक्ष पहिले आहे!”

(३) भावना दर्शविणाऱ्या वाक्यासह उद्गारवाचक शब्दाचे भाषांतर करा.

"हाय हाय, हे माझ्या प्रभु परमेश्वरा! कारण परमेश्वराच्या दूतास मी प्रत्यक्ष पहिले आहे!" (शास्ते ६:२२ युएलटी).

"हे प्रभू परमेश्वरा, माझ्या सोबत काय होईल? कारण परमेश्वराच्या दूतास मी प्रत्यक्ष पहिले आहे!" हे प्रभू परमेश्वर! "सहाय्य कर, कारण परमेश्वराच्या दूतास मी प्रत्यक्ष पहिले आहे!"

(४) अशा शब्दांचा वापर करा जे वाक्याच्या भागावर जोर देतील ज्याद्वारे तीव्र भावना उत्पन्न होतील.

त्याचे निर्णय किती गहन आहेत, व त्याचे मार्ग अगम्य आहेत (रोम ११:३३ब युएलटी)

"त्याचे निर्णय खूप गहन आहेत व त्याचे मार्ग अत्यंत अगम्य आहेत

(५) जर लक्षीत भाषेत तीव्र भावना स्पष्ट नसल्यास, तर त्या व्यक्तीला कसे वाटले हे सांगा.

जेव्हा गिदोनाने पाहीले की हा परमेश्वराचा दूत होता, तेव्हा गिदोनाने विलाप केला, "हाय हाय, हे माझ्या प्रभू परमेश्वरा! कारण परमेश्वराच्या दूतास मी प्रत्यक्ष पहिले आहे!" (शास्ते ६:२२ युएलटी).

हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनच्या लक्षात आले. तेव्हा तो भयभीत झाला व म्हणाला, "हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा! परमेश्वराच्या दूतास मी प्रत्यक्ष पहिले आहे!" (शास्ते)