mr_ta/translate/figs-euphemism/01.md

5.9 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

व्याजोक्ती हा अप्रिय, लाजिरवाणी किंवा सामाजिकरित्या अस्वीकार्य गोष्टीला संदर्भित करण्याचा एक सौम्य किंवा सभ्य मार्ग आहे जसे की मृत्यू किंवा सामान्यत: खाजगीत केले गेलेले कार्यक्रम.

… त्यांना शौल व त्याचे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले आढळले. (१ इति १०:८ब युएलटी)

याचा अर्थ शौल आणि त्याचे मुलगे "मरण पावले". हे व्याजोक्ती आहे कारण शौल व त्याचे पुत्र पडलेले होते हे महत्त्वाचे नव्हते पण ते मृत झाले आहेत. कधीकधी लोकांना मृत्यूविषयी प्रत्यक्ष बोलायला आवडत नाहीत कारण ते दु:खद आहे.

कारण हा भाषांतराचा मुद्दा आहे

वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या व्याजोक्ती वापरतात. लजर मूळ भाषा स्त्रोताच्या भाषेप्रमाणेच समान व्याजोक्ती भाषा वापरत नसेल, तर वाचकांना त्याचा अर्थ काय आहे हे समजत नाही आणि त्यांना असे वाटते की लेखक शब्दांच्या शब्दशः अर्थ सांगतो

पवित्र शास्त्रातील उदाहरणे

....जिथे एक गुहा होती. शौल त्याचे पाय झाकण्यासाठी आत गेला. (१ शमुवेल २४:३ब युएलटी)

मूळ श्रोत्यांनी असा समज केला असता की शौल शौचालय म्हणून वापर करण्यासाठी त्या गुहेत गेला, परंतु लेखकास त्यांचा अपमान करणे किंवा विचलित करणे टाळयाचे होते, म्हणून त्याने स्पष्टपणे सांगितले नाही शौलाने गुहेत काय केले किंवा काय सोडले.

तेव्हा मरीया दूतास म्हणाली, “ हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही ?” (लूक १:३४ युएलटी)

सौम्य असावे म्हणून, मरीयाने एखाद्या पुरुषाशी कधीही संभोग केला नाही असे म्हणण्यासाठी व्याजोक्तीचा उपयोग केला.

भाषांतर रणनीती

जजर व्याजोक्ती नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेस योग्य अर्थ देत असेल, तर ते वापरण्याचा विचार करा. नाही तर, येथे इतर पर्याय आहेतः

(१) आपल्या स्वत: च्या संस्कृतीद्वारे व्याजोक्तीचा वापर करा.

(२) जर माहीती आक्षेपार्ह नसेल तर ती व्याजोक्तीशिवाय सांगा.

भाषांतर पद्धतींचे उदाहरणाजे लागूकरण

(१) आपल्या स्वत: च्या संस्कृतीद्वारे व्याजोक्तीचा वापर करा.

…जिथे एक गुहा होती. शौल त्याचे पाय झाकण्यासाठी आत गेला. (१ शमुवेल २४:३ब युएलटी) काही भाषा याप्रमाणे व्याजोक्तींंचा वापर करत असतील:

“… जिथे गुहा होती. शौल एक छिद्र खणण्यास गुहेच्या आत गेला”

“… जिथे गुहा होती . शौल काही समय एकांत घालावा यासाठी गुहेच्या आत गेला”

परंतू मरीया दुतास म्हणाली, “हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही?” (लुक १:३४ युएलटी)

परंतु मरीया दुतास म्हणाली, “हे कसे होईल, कारण मी पुरुषाबरोबर निजले नाही?”

(२) जर माहीती आक्षेपार्ह नसेल तर ती व्याजोक्तीशिवाय सांगा.

त्यांना शौल व त्याचे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले आढळले. (१ इतिहास १०:८ब युएलटी)

“त्यांना शौल व त्याचे पुत्र गिलबोवा डोंगरात मरण पावलेल आढळले.”