mr_ta/translate/figs-distinguish/01.md

16 KiB

वर्णन

काही भाषांमध्ये, नामास सुधारित करणारे वाक्ये नामासह दोन भिन्न उद्देशांसाठी वापरले जाऊ शकतात. ते एकतर (१) इतर समान गोष्टीतून नामाला विभक्त करू शकतात किंवा (२) ते नामाविषय अधिक माहिती देऊ शकतात. ती माहिती वाचकांसाठी नवीन असू शकते, किंवा वाचकास आधीपासून कदाचित माहित असलेल्या एखाद्या गोष्टीचे स्मरणपत्र असू शकते. इतर भाषा नामाला इतर समान गोष्टींपासून विभक्त करण्यासाठी नामासह सुधारित वाक्यांशाचा उपयोग करतात. जेव्हा या भाषा बोलणारे लोक एखाद्या नामासह एक सुधारित वाक्यांश ऐकतात तेव्हा ते असे मानतात की त्याचे कार्य एका गोष्टीला दुसर्‍या समान  गोष्टीपासून वेगळे करणे आहे.

(१) समान गोष्टींमध्ये फरक करणे आणि (२) एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती देणे, यांच्यामध्ये असलेल्या भिन्नतेला चिन्हांकित करण्यासाठी भाषा स्वल्पविरामाचा वापर करतात. स्वल्पविरामांशिवाय, खाली असलेले वाक्य संवाद साधते की ते वेगळे करीत आहे:

  • मरीयेने तिच्या बहिणीला  जी खूप आभारी होती काही अन्न दिले.
    • जर तिची बहीण आभारी होती तर, "जी आभारी होती" हा वाक्यांश या मरीयाच्या बहिणीला दुसऱ्या बहीणीपासून जी सहसा आभारी नव्हती वेगळे करते.

स्वल्पविरामाने, वाक्य अधिक माहिती देत आहे:

  • मरीयेने तिच्या बहिणीला, जी खूप आभारी होती काही अन्न दिले.
    • मरीयेच्या बहिणीबद्दल आपल्याला अधिक माहीती देण्यासाठी याच वाक्यांशाचा उपयोग केला जावू शकतो. जेव्हा मरीयाने तिला अन्न दिले तेव्हा मरीयाच्या बहिणीने कसा प्रतिसाद दिला याबद्दल हे आपल्याला सांगते

कारण ही भाषांतराची समस्या आहे

  • बायबलच्या बर्‍याच स्त्रोतांच्या भाषेत नामाला दुसर्‍या समान गोष्टींपासून वेगळे करण्यासाठी आणि नामाविषयी अधिक माहीत देण्यासाठी वाक्यांशांचा उपयोग केला जातो जे नामाची सुधारणा करतात. तुम्ही (भाषांतरकार) प्रत्येक प्रकरणात लेखकाच्या अर्थाचा कोणाता हेतू आहे यास समजून घेणे आवश्यक आहे.
  • काही भाषांमध्ये वाक्यांशाचा उपयोग केला जातो जे इतर समान गोष्टीपासून नामाला केवळ वेगळे करण्यासाठी नामाची सुधारणा करतात. अधिक माहिती देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वाक्यांशाचे भाषांतर करताना, या भाषा बोलणार्‍या भाषांतरकारांना वाक्यांशाला नामापासून विभक्त करणे आवश्यक आहे. अन्यथा, जे लोक ते वाचतात किंवा ऐकतात, त्यांना असे वाटेल की हा वाक्यांश इतर समान गोष्टींपासून नामास विभक्त करण्यासाठी आहे.

बायबलमधील उदाहरणे

इतर शक्य असलेल्या गोष्टींपासून एका गोष्टीला वेगळे करण्यासाठी उपयोगात येणारा शब्द व वाक्यांश यांची उदाहरणे :

( हे सहसा भाषांतरात कोणतीही समस्या उद्भवत नाहीत.)

परम पवित्र स्थानापासून पवित्र स्थानाला वेगळे करण्याचा पडदा आहे. (निर्गम २६:३३ब युएलटी)

“पवित्र” आणि “परम पवित्र” हे शब्द एकमेकांपासून आणि इतर कोणत्याही ठिकाणापासून दोन वेगळ्या ठिकाणांना भिन्न करतात

एक मुर्ख मुलगा आपल्या बापाला दुःख देतो, अणि  जीने त्याला जन्म दिला तीला क्लेश देतो. (नीतिसूत्रे १७:२५ युएलटी)

"जीने त्याला जन्म दिला" हा वाक्यांश  ज्या स्त्रीस पुत्र क्लेश आहे तिच्यामध्ये फरक करतो . तो सर्व स्त्रियांसाठी मुर्ख नाही, पण त्याच्या आईसाठी आहे.

शब्द आणि वाक्य यांची उदाहरणे जी अतिरिक्त माहिती किंवा एखाद्या गोष्टीबद्दल स्मरण देण्यासाठी वापरली जातात:

(हे भाषा वापरत नसलेल्या भाषांसाठी ही भाषांतरातील समस्या आहे.)

… कारण तुझे न्याय्य निर्णय चांगले आहेत. (स्तोत्र ११९:३९ब युएलटी)

"न्याय" हा शब्द आपल्याला सहज स्मरण करून देतो की देवाचे निर्णय न्याय्य आहेत. ते त्याच्या न्याय्य निर्णयांचा त्याच्या अन्यायी निर्णयामध्ये भेद करीत नाही, कारण त्याचे सर्व निर्णय न्याय्य आहेत.

सारा जी ९० वर्षाची आहे तीला मूल कसे होऊ शकते? - (उत्पत्ती १७:१७-१८ युएलटी)

“ जी ९० वर्षांची आहे” या वाक्यांशामुळे सारेला पुत्र होईल हे अब्राहामाला वाटले नाही. तो सारा नावाच्या एका स्त्रीचा अन्य सारा नावाच्या स्त्री जी वेगळ्या वयाची होती तीच्यामध्ये फरक करत नाही, आणि तो कोणालाही तिच्या वयाबद्दल काही नवीन सांगत नव्हता. त्याने केवळ असा विचार केला नाही की एक स्त्री जी एवढी वयस्कर याहे तीला मुल होऊ शकते

मी घडविलेल्या मानवाला भुतलावरून नष्ट करीन. (उत्पत्ती ६:७ युएलटी)

“मी ज्यांना घडविले आहे” हा वाक्यांश देव आणि मानवजातीमधील नातेसंबंधाची एक आढवण आहे. या मानवजातीला नष्ट करुन टाकण्याचा अधिकार देवाला होता याचे हेच कारण आहे. देवाने निर्माण केली नाही अशी आणखी कोणतीही मानवजात नाही.

भाषांतर रणनीती

वाचकांना एखाद्या नामासह असलेल्या वाक्यांशाचा हेतू समजत असेल तर, वाक्यांश आणि नाम एकत्र ठेवण्याचा विचार करा. कारण भाषा शब्द किंवा वाक्यांश यांचा नामासह वापर केवळ एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीपासून भिन्न करण्यासाठी करतात, माहिती किंवा स्मरण करून देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वाक्यांशांचे भाषांतर करण्यासाठी येथे काही रणणीती आहेत.

(१) वाक्याच्या दुसर्‍या भागामध्ये माहिती ठेवा आणि त्याचा हेतू दर्शविणाऱ्या शब्दांना जोडा. (२) ही केवळ अतिरिक्त माहिती आहे हे व्यक्त करण्यासाठी आपल्या भाषेतील मार्गांपैकी एका मार्गाचा उपयोग करा. असे कदाचित एखादा लहान शब्द जोडून, किंवा प्रयोग बदलण्याच्या मार्गाद्वारे होऊ शकते. कधीकधी प्रयोगामधील बदल विरामचिन्ह, जसे कंस किंवा स्वल्पविराम यांनी दर्शविले जाऊ शकतात.

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण

(१) वाक्याच्या दुसर्‍या भागामध्ये माहिती ठेवा आणि त्याचा हेतू दर्शविणाऱ्या शब्दांना जोडा.

  • मी अशा लोकांना द्वेष करतो जे निरर्थक मूर्तीची सेवा करतात (स्तोत्र 31: 6 IRV) - "निरुपयोगी मूर्ती" म्हणत, दाविद सर्व मूर्ती बद्दल टिप्पणी करीत होता आणि त्यांना त्यांची सेवा करणाऱ्यांना द्वेष देण्याचे कारण देत आहे. तो मौल्यवान मूर्तीपासून निर्जीव मूर्तीं यांच्यात फरक करीत नव्हता.

जे निरर्थक मुर्तींना पुजतात त्यांचा मी द्वेष करतो (स्तोत्र ३१:६ युएलटी)

“निरर्थक मूर्ती” असे म्हणून, दावीद सर्व मूर्तींबद्दल भाष्य करीत होता आणि त्यांची पुजा करणाऱ्यांचा तिरस्कार करण्याचे कारण देत होता. तो निरर्थक मूर्तींंचा मुल्यवान मुर्तींमध्ये फरक करत नव्हता़.

कारण मुर्ती निरर्थक आहेत, जे लोक त्यांची पुजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो.

… कारण तुझे न्याय्य निर्णय चांगले आहेत. (स्तोत्र ११९:३९ब युएलटी)

… कारण तुझे निर्णय चांगले आहेत कारण ते न्याय्य आहेत.

सारेला, जी ९० वर्षाची आहे, तीला पुत्र होऊ शकतो का? (उत्पत्ती १७:१७ब युएलटी)

“जी ९० वर्षाची आहे” हा वाक्यांश सारेच्या वयाचे एक स्मरणपत्र आहे. अब्राहाम प्रश्न का विचारत होता ते सांगते. त्याला अशी अपेक्षा नव्हती की जी स्त्री एवढी वयस्कर आहे ती मूलाला जन्म देऊ शकेल

जेव्हा ती ९० वर्षाची असनाही सारा मुलाला जन्म देऊ शकते काय?

मी परमेश्वराचा धावा करील, जो स्तुतीसपात्र आहे. (२ शमुवेल २२:४अ युएलटी) एकच परमेश्वर आहे. “जो स्तुतीसपात्र आहे" हा वाक्यांश परमेश्वराचा धावा करण्यास एक कारण देतो.>

मी परमेश्वराचा धावा करील, कारण तो स्तुतीस पात्र आहे

(२) ही केवळ अतिरिक्त माहिती आहे हे व्यक्त करण्यासाठी आपल्या भाषेतील मार्गांपैकी एका मार्गाचा उपयोग करा.

तु माझा पुत्र आहे, ज्यावर मी प्रेम करतो. मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे. (लूक ३:२२ युएलटी)

तु माझा पुत्र आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे.

माझ्या प्रेमाचा स्विकार करून, तु माझा पुत्र आहेस. मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे.