mr_ta/translate/figs-apostrophe/01.md

38 lines
5.9 KiB
Markdown

**व्याख्या**
अ‍ॅस्ट्रोट्रोफी हा शब्दालंकार आहे ज्यामध्ये वक्ता आपले ऐकत असलेल्यांवरून आपले लक्ष वळवतो व एखाद्याशी किंवा एखादी गोष्टीविषयी बोलतो ज्याबद्दल त्याला ठाऊक आहे की त्याचे ऐकू शकत नाही.
आपल्या श्रोत्यांना त्याचा संदेश किंवा त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या गोष्टीबद्दलच्या भावना अगदी दृढ मार्गाने सांगण्यासाठी तो असे करतो.
### कारण ही भाषांतराची समस्या आहे
बर्‍याच भाषांमध्ये अ‍ॅस्ट्रोटॉफी वापरले जात नाही, व त्यामुळे वाचक गोधळून जाऊ शकतात. त्यांना कदाचित आश्चर्य वाटेल की वक्ता कोणाशी बोलत आहे, किंवा विचार करत असेल की ज्या गोष्टीं किंवा लोक ऐकू शकत नाही त्यांना बोलणारा हा वक्ता वेडाच आहे.
### बायबलमधील उदाहरणे
>गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो (२ शमुवेल १:२१ युएलटी)
शौल राजा गिलबोवा पर्वतावर मारला गेला व दाविदाने त्याबद्दल दु:खाचे गीत गायले. या पर्वतांवर दव किंवा पाऊस पडू नये अशी त्याची इच्छा आहे असे त्यांना सांगून, त्याने दाखविले की तो किती दु:खी आहे.
>यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांना ठार करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांवर दगड्मार करणारे. (लूक १३:३४अ युएलटी)
येशू यरुशलेमधील लोकांबद्दल त्याच्या शिष्यांसमोर आणि परुश्यांच्या समुहासमोर आपली भावना व्यक्त करीत होता.यरुशलमेस जसे तीचे लोक ऐकू शकतात असे थेटपणे बोलून, त्याने त्यांच्याविषयी किती सखोल काळजी घेतली हे येशूने दाखवून दिले.
>परमेश्वराच्या आज्ञेद्वारे त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले: "**हे वेदी**, **हे वेदी**! परमेश्वर म्हणतो,पाहा, ... मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळील." (१ राजे १३: २ युएलटी)
देवाचा मानुस वेदीस बोलत आहे जणू काय ती ऐकू शकते, परंतू खरेपाहता तेथे उभा असलेल्या राजाला तो बोलू इच्छित होता.
### भाषांतर पध्दती
जर अपॉस्ट्रॉफी नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेत योग्य अर्थ प्रदान करत असेल, तर त्याचा वापर करण्याचा विचार करा. परंतु जर अश्याप्रकारे बोलण्याची पध्दत लोकांना गोंधळात टाकणारी असेल तर, वक्तास लोक किंवा वस्तू यांच्याविषयी आपला संदेश व भावना **त्यांना** सांगत असल्याप्रमाणे त्याचे ऐकत असलेल्या लोकांशी बोलावे. खालील उदाहरण पाहा.
### भाषांतर पध्दतीच्या उदाहरणाचे लागूकरण
>परमेश्वराच्या आज्ञेद्वारे त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले: "**हे वेदी**, **हे वेदी**! परमेश्वर म्हणतो,पाहा, ... मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळील." (१ राजे १३: २ युएलटी )
>
> > त्याने वेदीबद्दल असे म्हटले: "**या वेदीबद्दल** परमेश्वर म्हणतो. 'पाहा, ... ते मानवांच्या अस्थी **तीच्या**वर जाळतील."
>
> **गिलबोवाच्या डोंगरांनो**,**तुमच्यावर** दहिवर व पाऊस न पडो. (२ शमुवेल १:२१अ युएलटी)
>
> > **जसे गिलबोवाच्या या डोंगरांकरीता**, **त्यांच्या**वर दहिवर व पाऊस पडू नये.