mr_ta/translate/figs-activepassive/01.md

12 KiB

काही भाषेमध्ये दोन्ही कर्तरी आणि कर्मरी वाक्य आहेत. कर्तरी वाक्यामध्ये कर्ता क्रिया करतो. कर्मरी वाक्यामध्ये कर्त्याकडून क्रिया करून घेतली जाते. येथे अशी काही उदाहरणे जी त्याच्या कार्यासहीत आहेत जी अधोरेखित करण्यात आली आहेत:

  • कर्तरी: माझ्या वडीलांनी २०१० ला घर बांधले आहे.
  • कर्मणी:  घर 2010 साली बांधण्यात आले.

ज्या भाषांमध्ये कर्मणी वाक्ये वापरली जात नाहीत अशा भाषांतरकारांना ते बायबलमध्ये सापडलेले कर्मणी वाक्य कसे भाषांतरित करतात हे माहित असणे आवश्यक आहे. इतर अनुवादकांना कर्मणी वाक्य कधी वापरावे आणि कर्तरी स्वरूप कधी वापरायची हे ठरवणे आवश्यक राहील.

वर्णन

काही भाषांमध्ये वाक्यांच्या कर्तरी आणि कर्मरी दोन्ही प्रकार आहेत.

  • कर्तरी स्वरूपात, कर्ता क्रिया करतो आणि नेहमी उल्लेख केला जातो. *कर्मणी स्वरूपात, या कर्त्याकडून क्रिया करून घेतली जाते, आणि जो क्रिया करतो त्याचा नेहमी उल्लेख केला जात नाही

खालील कर्तरी आणि कर्मरी वाक्यांच्या उदाहरणांमध्ये, आम्ही या विषयावर अधोरेखीत केले आहे.

  • कर्तरी; माझ्या वडिलांनी 2010 मध्ये घर बांधले.
  • कर्मणी  घर 2010 साली माझ्या वडिलांकडून बांधण्यात आले.
  • कर्मर्णी घर 2010 साली बांधण्यात आले. (हे कोणी केले ते सांगत नाही.)

कारण हा भाषांतर मुद्दा आहे

सर्व भाषा कर्तरी स्वरूप वापरतात. काही भाषा कर्मणी स्वरूप वापरतात आणि काही त्या वापरत नाहीत. काही भाषा केवळ काही विशिष्ट उद्देशांसाठी कर्मणी वापरतात आणि त्या स्वरूपाच्या सर्व भाषांमध्ये कर्मणी स्वरूप समान हेतूंसाठी वापरला जात नाही.

कर्मणी चा हेतू

  • वक्ता ज्या व्यक्तीने किंवा ज्या गोष्टीवर कृती केली होती त्याबद्दल बोलत आहे, कृती केलेल्या व्यक्तीबद्दल नाही.
  • वक्ता हे सांगू इच्छित नाही की कृती कोणी केली.
  • ही क्रीया कोणी केली हे वक्त्याला माहिती नाही.

कर्मणी पद्धतीसंबंधी भाषांतराची तत्त्वे

  • ज्या भाषांतरकारांची भाषा कर्मणी स्वरुपाचा वापर करीत नाहीत त्यांना ही कल्पना व्यक्त करण्याचा दुसरा मार्ग शोधणे आवश्यक आहे.
  • ज्या भाषेत कर्मणी स्वरुपाचे भाषांतरकार आहेत त्यांना बायबलमधील एका विशिष्ट वाक्यात कर्मणी का वापरले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे आणि त्या वाक्याच्या भाषांतरात त्या हेतूसाठी कर्मणी रूप वापरायचे की नाही हे ठरवणे आवश्यक आहे.

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे

मग त्यांच्या नेमबाजांनी भिंतीवरून तुमच्या सैनिकांवर गोळ्या झाडल्या आणि राजाच्या काही सेवकांना ठार मारले गेले. आणि तुमचा सेवक उरिया हित्ती ह्यालाही ठार मारले गेले. (२ शमुवेल ११:२४ ULT)

याचा अर्थ असा होतो की शत्रूच्या तिरंदाजांनी तटावरून बाण सोडले आणि उरीयासहित राजाचे कित्येक लोक मारण्यात आले. मुद्दा राज्याचे सेवक आणि उरीया यांच्याबाबतीत काय घडले ते, त्यांना बाण मारणाऱ्यांना माहित नव्हते. कर्मणी प्रकाराचा उद्देश राजाच्या कर्मचा-यावर आणि उरीयाकडे लक्ष केंद्रित करणे हा आहे.

जेव्हा शहरातील लोक पहाटे उठले आणि पहा बआलच्या वेदीची मोडतोड केलेली होती. (शास्ते 6: 28 अ ULT)

तेथील लोकांनी बालच्या वेदीच्या बाबतीत काय घडले ते पाहिले, परंतु ते कोणी तोडून टाकले हे त्यांना ठाऊक नव्हते. येथील कर्मणी स्वरूपाचा हेतू शहरातील लोकांच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम सांगणे आहे.

त्याच्या गळ्यात जात्याचा दगड ठेवला जावा आणि त्याला समुद्रात फेकले जावे (लूक 17: 2 a ULT) हे त्याच्यासाठी अधिक चांगले होईल.

हे अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यात एखाद्या व्यक्तीला त्याच्या गळ्यात असलेल्या जात्याच्या तळीसह समुद्रात टाकावे. कर्मणी प्रकाराचा हेतू या व्यक्तीस काय होते त्यावर लक्ष केंद्रित करणे हा असतो. व्यक्तीला या गोष्टी कोण करते हे महत्वाचे नाही.

भाषांतर रणनीती

आपली भाषा आपण अनुवाद करीत असलेल्या परिच्छेदाच्या प्रमाणेच एक कर्मणी स्वरूप वापरत असल्यास, एक कर्मणी स्वरूप वापरा. कर्मणी स्वरूपाशिवाय भाषांतर करणे अधिक चांगले ठरविल्यास येथे काही रणनीती आहेत ज्यांचा आपण विचार करू शकता.

(१) कर्तरी वाक्यात समान क्रियापद वापरा आणि कुणी किंवा कोणत्या कृतीने केले ते सांगा. आपण हे करत असल्यास, क्रिया प्राप्त करणार्‍या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. (२) कर्तरी वाक्यात समान क्रियापद वापरा आणि कोणाने किंवा कृती केली हे सांगू नका. त्याऐवजी “ते” किंवा “लोक” किंवा “कोणीतरी” सारखे सामान्य अभिव्यक्ती वापरा. (३) भिन्न क्रियापद वापरा.

भाषांतराच्या धोरणांची उदाहरणे लागू केली

  1. कर्तरी वाक्यात समान क्रियापद वापरा आणि क्रिया कोणी केली ते सांगा. आपण असे केल्यास, क्रिया प्राप्त झालेल्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

भाकरीवाल्याच्या रस्त्यावरुन त्याला दररोज एक भाकरी देण्यात आली. (यिर्मया:३७;२१ ब)

राजाच्या सेवकांनी यिर्मयाला भटाऱ्याच्या रस्त्यावरुन रोज भाकर दिली.

(२) कर्तरी वाक्यात समान क्रियापद वापरा आणि कृती कोणी केली हे सांगू नका. त्याऐवजी “ते” किंवा “लोक” किंवा “कोणीतरी” सारखे सर्वसामान्य अभिव्यक्ती वापरा.

त्याच्या गळ्यात तळी ठेवली जावी आणि त्याला समुद्रात फेकले जावे तर बरे होईल. (लूक 17: 2aयूएलटी)

त्यांनी त्याच्या गळ्यात एक तळी ठेवावी आणि त्याला समुद्रात फेकले तर बरे होईल. कोणीतरी त्याच्या गळ्यात एक भारी दगड ठेवला आणि त्याला समुद्रात फेकले तर त्याच्यासाठी ते बरे होईल.

सक्रिय वाक्यात भिन्न क्रियापद वापरा.

भाटाऱ्याच्या रस्त्यावरुन त्याला दररोज एक भाकरी देण्यात आली. (यिर्मया :37:21 ULT)

त्याला भाटाऱ्याच्या रस्त्यावरुन दररोज एक भाकर मिळाली.