mr_ta/translate/figs-123person/01.md

9.5 KiB

सामान्यतः वक्ता स्वत:ला "मी" आणि ज्या व्यक्तीस तो बोलत आहे त्यास "तुम्ही" म्हणून संबोधित करतो. कधीकधी बायबलमध्ये वक्ता स्वत:स किंवा ज्या व्यक्तीस तो बोलत आहे त्यास "मी" किंवा "तुम्ही" याव्यतिरिक्त इतर संज्ञांनी संबोधित करतो.

वर्णन

  • प्रथम पुरुष - अशा प्रकारे वक्ता सामान्यपणे स्वतः ला संबोधित करतो. इंग्रजीमध्ये "मी" आणि "आम्ही" सर्वनाम वापरले जाते. (तसेच: मी, माझे, माझी; आम्ही, आमचा, आमचे)
  • द्वितीय पुरुष - अशा प्रकारे वक्ता सामान्यपणे व्यक्तीला किंवा बोलत असलेल्या लोकांना संबोधित करतो. इंग्रजीमध्ये "तुम्ही" हे सर्वनाम वापरले जाते. (तसेच: तुझे, तुमचे)
  • तृतीय पुरुष - अशा प्रकारे वक्ता सामान्यपणे कोणालातरी संबोधित करतो. इंग्रजीमध्ये "तो," "ती," "ते" आणि "ते" असे सर्वनाम वापरले जातात. (तसेच: त्याला, त्याचे, तिला, तिचे, त्याचे; त्यांना, त्यांचे, त्यांचे) "मनुष्य" किंवा "स्त्री" यासारख्या नाम संज्ञा तृतीय पुरुष आहे.

कारण हा भाषांतर मुद्दा आहे

कधीकधी बायबलमध्ये वक्त्या स्वतःला किंवा ज्या लोकांना तो बोलत होता त्यांना संबोधित करण्यासाठी तृतीय पुरुष वापर करतो. वाचक कदाचित असा विचरा करतील की वक्ता इतर कोणाचातरी संदर्भ देत होता. त्यांना कदाचित समजले नाही की त्याच्या म्हणण्याचा अर्थ "मी" किंवा "तुम्ही" असा होता.

बायबलमधील उदाहरणे

काहीवेळा लोकांनी स्वतःला संबोधित करण्यासाठी "मी" किंवा "मला" ऐवजी तृतीय पुरुष उपयोग केला.

मग दावीद शौलास म्हणाला “तुझा दास

त्याच्या बापाचे मेंढरे” राखत असे (१ शमुवेल १७:३४ यु.एल.टी)

दावीदाने स्वत:ला तृतीय पुरुष “तुझा दास” म्हणून संबोधित केले आणि “त्याच्या” या सर्वनामाचा वापर केला. तो आपली नम्रता शौलासमोर दाखविण्याठी स्वत:स शौलाचा सेवक म्हणून संबोधित करत होता

मग परमेश्वराने वादळातून ईयोबाला उत्तर दिले व म्हणाला: “… देवाच्या बाहूप्रमाणे तुझे आहेत काय? त्याच्या आवाजाप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?” (ईयोब ४०:६, ९ यु.एल.टी)

देवाने स्वत: ला "देवाच्या" आणि "त्याच्या" या शब्दांने तृतीय पुरुषामध्ये संबोधित केले. आणि तो शक्तीशाली आहे यावर जोर देण्यासाठी असे केले.

कधीकधी लोक एखाद्या व्यक्तीला किंवा ते बोलत असलेल्या लोकांना संबोधित करण्यासाठी "तूम्ही" किंवा "तुमचे" ऐवजी तृतीय पुरुषाचा वापर करतात.

अब्राहामाने उत्तर दिले व म्हणाला, “पाहा, मी धुळ व राख असुनहीस पमेश्वराशी बोलण्याचे मी साहस करत आहे; (उत्पत्ती 18:27 यूएलटी)

अब्राहाम परमेश्वराशी बोलू लागला, आणि त्याने परमेश्वराला "तू" ऐवजी "माझा प्रभू" म्हमून संबोधित केले. देवापुढे त्याची नम्रता दर्शविण्यासाठी त्याने असे केले.

जर तुम्ही प्रत्येकजण त्याच्या भावाला आपल्या मनातून क्षमा करीत नाही, तर त्याचप्रमाणे माझा पिता देखील तुमचे करील . (मत्तय १८:३५ यु.एल.टी)

"प्रत्येक जण" असे म्हटल्यानंतर, येशूने "तुमच्या" ऐवजी "त्याच्या" या तृतीय व्यक्तीचा वापर केला.

भाषांतर रणनीती

जर तृतीय पुरुषाचा अर्थ "मी" किंवा "तुम्ही" वापरल्याने तो नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेला योग्य अर्थ देत असेल, तर त्याचा वापर करण्याचा विचार करा. जर नाही, तर येथे काही इतर पर्याय आहेत.

(१) सर्वानाम "मी" किंवा "तुम्ही" याबरोबर तृतीय पुरुषाच्या वाकांशाचा वापर करा

(२). तृतीय पुरषाऐवजी फक्त प्रथम पुरुष ("मी") किंवा द्वितीय पुरुष ("तुम्ही") वापरा.

भाषांतर पद्धतींचे उदाहरणांचे लागुकरण

(१) सर्वानाम "मी" किंवा "तुम्ही" याबरोबर तृतीय पुरुषाच्या वाक्यांशाचा वापर करा.

मग दावीद शौलास म्हणाला “तुझा दास

त्याच्या बापाचे मेंढरे” राखत असे (१ शमुवेल १७:३४)

मग दावीद शौलास म्हणाला, “मी, तुझा दास, माझ्या बापाची मेंढरे राखत असे.”

(२). तृतीय पुरुषाऐवजी फक्त प्रथम पुरुष ("मी") किंवा द्वितीय पुरुष ("तुम्ही") वापरा.

मग परमेश्वराने भयंकर वादळातून ईयोबला उत्तर दिले व म्हणाला," … देवाच्या बाहूप्रमाणे तुझ्याकडे आहे काय? त्याच्या आवाजाप्रमाणे गर्जना करता येते काय?” (ईयोब ४०:६, ९ यु.एल.टी)

मग परमेश्वराने भयंकर वादळातून ईयोबला उत्तर दिले व म्हणाला,": ... माझ्याप्रमाणे तुझ्याकडे बाहू आहे काय? माझ्या आवाजाप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?”

जर तुम्ही प्रत्येक जण त्याच्या बंधुला मनापासून क्षमा करीत नाही, तर माझा स्वर्गीय पिता देखील तुमचे तसेच करील. (मत्तय १८:३५ यु.एल.टी)

जर तुम्ही प्रत्येक जण तुमच्या बंधुला मनापासून क्षमा करीत नाही, तर माझा स्वर्गीय पिता देखील तुमचे तसेच करील..