mr_ta/translate/bita-plants/01.md

5.8 KiB

बायबलमधील वनस्पतींमधील काही प्रतिमा वर्णक्रमानुसार खाली सूचीबद्ध केल्या आहेत. सर्व मोठ्या अक्षरातील शब्द कल्पना दर्शवतात. हा शब्द ज्या प्रत्येक वचनामध्ये प्रतिमा आहे त्यामध्ये शब्द अपरिहार्यपणे दिसत नाही, परंतु शब्द प्रस्तुतीकरण करतो अशी कल्पना आहे.

शाखा एका व्यक्तीच्या वंशजांना प्रतिनिधित्व करते

खालील उदाहरणांत, यशयाने इशायाच्या वंशजांपैकी एकाविषयी लिहिले आणि यिर्मयाने दाविदाच्या वंशातील एका वंशाबद्दल लिहिले.

इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. (यशया 11:1 IRV)

परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरिता एक नीतिमान अंकुर उगववीन. तो राजा म्हणून राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत. (यिर्मया 23:5 IRV)

ईयोबामध्ये जेव्हा "त्याची शाखा कापली जाईल" असे म्हणले जाते तेव्हा त्याचा असा अर्थ होतो की त्याच्यापाशी कोणतेही वंश येणार नाही.

त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.

पृथ्वीवरील लोकांना त्याची आठवण राहाणार नाही. आता त्याची आठवण कुणालाही येणार नाही. (ईयोब 18:17 IRV)

वनस्पती एका व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते

म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल..... तो तुला जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून<?u> टाकील. (स्तोत्र 52:5 IRV)

वनस्पती एक भावना किंवा वृत्ती दर्शवते

ज्याप्रमाणे एक प्रकारचे बियाणे लावण्यामुळे त्या प्रकारचे वनस्पती वाढते, अशा पद्धतीने वागणे म्हणजे अशा प्रकारचे परिणाम.

वचनामध्ये भावना किंवा वृत्ती खाली अधोरेखित आहे. तुम्ही आपणासाठी नितीमत्वाची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल. (होशेय 10:12 IRV)

मला काही अन्यायी आणि आयुष्य कष्टी करणारे लोक माहित आहेत, पण अशा लोकांना नेहमी शासन होते. (ईयोब 4:8 IRV)

म्हणून त्यांच्यावर संकटे येतील-ते वावटळीचे पीक निर्माण करतील. (होशेय 8:7 IRV)

तुम्ही नीतिमत्तेच्या... फळाऐवजी कडूदवणा केला आहे. (आमोस 6:12 IRV)

आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे? (रोम. 6:21 IRV)

झाड एका व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते

त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो तो जे काही करतो ते यशस्वी होते. (स्तोत्र 1:3 IRV)

मी एक निर्दय दुर्जन पहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. (स्तोत्र 37:35 IRV)

देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे. (स्तोत्र 52:8 IRV)