mr_ta/translate/bita-hq/01.md

24 KiB
Raw Permalink Blame History

शरीरातील अवयव आणि मानवी गुण यांचा समावेश असलेल्या बायबलमधील काही सामान्य उपमा आणि रुपक खाली वर्णमालेच्या क्रमाने सूचीबद्ध केले आहेत. सर्व मोठ्या अक्षरारातील शब्द एक कल्पना दर्शविणाऱ्या प्रतिमेची ओळख करूण देतात. प्रतिमेचा विशिष्ट शब्द प्रतिमेचा उपयोग करणाऱ्या प्रत्येक वचनात दिसणार नाही, परंतु मजकूर काही प्रमाणात प्रतिमेच्या संकल्पनेला संप्रेषित करेल.

शरीर लोकांच्या समूहाचे प्रतिनिधित्व करते.

आता तुम्ही ख्रिस्ताचे शरीर अहात व वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात. (१ करिंथ. १२:२७ युएलटी)

त्याऐवजी, प्रीतीने सत्य बोलून, ख्रिस्त जो मस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारे वाढावे, ज्याच्याद्वारे सबंध शरीर प्रत्येक अवयवाच्या कार्याच्या परिमाणानुसार, जोडले जाते व अस्थिबंधनात एकत्र केले जाते, यामुळे आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरिराची वाढ होते

या वचनांमध्ये, ख्रिस्ताचे शरीर ख्रिस्ताचे अनुसरण करणाऱ्या लोकांच्या समुहाचे प्रतिनिधित्व करते

एक बंधू एखाद्या व्यक्तीचा नातेवाईक, सहकारी किंवा सोबती यांचे प्रतिनिधित्व करतो

कारण मर्दखय यहुदी हा राजा अहश्वेरस याच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर होता, व यहुदी लोकांमध्ये फार थोर होता. व त्याला त्याच्या बंधु समुदायात पसंती होती … (एस्तेर १०:३अ युएलटी)

एक कन्या नगर किंवा शहर याच्या लगत असलेल्या गावाला दर्शविते

एक आई आवती भोवती गाव असलेल्या शहराला दर्शवते

यहूदाच्या वंशातील काहीजण खेड्यात आपापल्या शेतात राहात होते: किर्याथ अर्बामध्ये व त्याच्या खेड्यांत; व दिबोनामध्ये व त्याच्या खेड्यांत; यकब्सेलामध्ये व त्याच्या खेड्यांत… (नहेम्या ११:२५ युएलटी)

मुख हे एखाद्याची उपस्थिती, दृष्टी, ज्ञान, समज, लक्ष, किंवा न्याय यास दर्शविते

मग एस्तेरने तिच्या कृत्याची पुनरावृत्ती केली आणि ती राजाच्या मुखासमोर बोलली. (एस्तेर ८:३अ युएलटी)

तू आपले मुख का लपवितोस व आमचा क्लेश व आमता छळ का विसरतोल ? (स्तोत्र ४४:२४ युएलटी)

एखाद्याचा चेहरा एखाद्यापासून लपविणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे होय.

अधिपतीचे मुख संपादण करण्यास पुष्कळ लोक झटतात; (नीतिसूत्रे २९:२६ युएलटी)

जर कोणी दुसऱ्या व्यक्तीच्या मुखाचा शोध घेत असेल तर, त्याला अशी आशा असते की त्या व्यक्तीचे त्याच्याकडे लक्ष जाईल.

परमेश्वर म्हणतो —तु मला घाबरत नाहीस का — किंवा माझ्या पुढे थरथर कापत नाहीस का?(यिर्मया ५:२२ युएलटी)

इस्त्राएलाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष जो आपल्या ह्रदयात आपल्या मुर्ती वागवितो, किंवा आपले अपराधाचे अडखळण आपल्या दृष्टी पुढे ठेवतो, व नंतर संदेष्ट्याकडे येतो — मी, परमेश्वर, त्याच्या मुर्तीच्या संख्येनुसार त्याला उत्तर देईल (यहेज्केल १४:४ युएलटी)

एखाद्याच्या मुखासमोर काहीतरी ठेवणे म्हणजे त्याकडे लक्षपूर्वक पाहणे किंवा त्याकडे लक्ष देणे होय.

मुख पुढे असलेल्या गोष्टींना दर्शविते

मग हथाक, राजाच्या द्वारासमोर असलेल्या शहराच्या मोकळ्या जागेत मर्दखयाकडे गेला. (एस्तेर ४:६ युएलटी)

ती त्याच्या समोर त्याच्या पाया पडली व रडली व अगागी हामानाचे अनर्थ आणि त्याने रचलेले कट हे रद्द करावे म्हणून तिने त्याला काकुळतीने विनवनी केली. (एस्तेर ८:३ब युएलटी)

मुख एखाद्या गोष्टीच्या पृष्ठभागाला दर्शविते

संपुर्ण देशाच्या पृष्ठभागावर दुष्काळ होता. (उत्पत्ती ४१:५६अ युएलटी)

तो चंद्राचे मुख झाकून टाकीतो व त्यावर आपले मेघ पसरितो. (ईयोब २६:९ युएलटी)

पिता एखाद्याच्या पुर्वजाला दर्शवतो

पुत्र एखाद्याच्या वंशाला दर्शवतो

परंतू ते गर्विष्ठपणे वागले, ते व आमचे पुर्वज. व त्यांनी आपली मान ताठ केली व तुझ्या आज्ञा मानल्या नाहीत. (नहेम्या ९:१६ युएलटी)

“ तुझ्या सेवकांचे जे तुझ्या नामाने आमचे राजे, पुढारी, वडील, व देशातील सर्व लोकांशी बोलले त्यांचे आम्ही ऐकले नाही. हे परमेश्वर,न्यायत्व तुझेच आहे …” (दानीएल ९:६-७अ युएलटी)

हात एखाद्याची शक्ती, नियंत्रण, कार्य किंवा कृती यास दर्शवते

परमेश्वर माझ्या हाताद्वारे पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रुंवर तुटुन पडला. (१ इतिहास १४:११ युएलटी)

“परमेश्वर माझ्या हाताद्वारे तुटुन पडला” म्हणजे “परमेश्वराने माझ्या शत्रुंवर तुटुन पडण्यासाठी माझा उपयोग केला.”

तुझ्या हाताला तुझे सर्व वैरी लागतील; तुझ्या उजव्या हातात जे तुझा द्वेश करतात ते पडतील. (स्तोत्र २१:८ युएलटी)

“तुझ्या हाताला तुझे सर्व वैरी लागतील” म्हणजे “ तुझ्या शक्तीने तु तुझ्या सर्व वैऱ्यांना पकडशील.”

पाहा, उध्दार करू शकत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. (यशया ५९:१ युएलटी)

“त्याच्या हात तोकड नाही” म्हणजे तो दुर्बळ नाही .

मस्तक, टोक, वर किंवा कोणत्याही गोष्टीच्या सर्वात वरच्या भागाला दर्शवते.

व राजाने आपल्या हातात असलेले सुवर्णदंड एस्तरकडे पुढे केला, तेव्हा एस्तेरने जवळ येऊन सुवर्णदंडाच्या टोकाला स्पर्श केला. (एस्तेर ५:२ब युएलटी)

मन विचाराच्या व भावनेच्या कृतीला दर्शविते

बवाजाने खाणे व पिणे केल्यावर, त्याचे चित्त प्रसन्न झाले, व तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेला निजला. (रुथ ३:७अ युएलटी)

सातव्या दिवशी, जेव्हा राजाचे मन द्राक्षरसाने आनंदित झाले असत… (एस्तेर १:१०अ युएलटी)

हृदय एखाद्याच्या मनोवृत्तीला दर्शविते

मग अहश्वेरोस राजा बोलला व एस्तेर राणीला विचारले , “तो कोण, पुरुष आहे? हा पुरुष कोठे आहे, जो असे करण्याचे धाडस करतो?” (एस्तेर ७:५ )

या संदर्भात, धाडस करणे म्हणजे गर्विष्ठ किंवा उन्मत्त होणे

नेत्र दृष्टी, ज्ञान, समज, लक्ष किंवा निर्णय यास दर्शिवतात

कारण राणीची बाब सर्व स्त्रियांकडे जाईल , यामुळे त्या आपल्या पतींना तुच्छ समजतील … (एस्तेर १:१७अ युएलटी)

नेत्र एखाद्याच्या मनोवृत्तीला दर्शवितात

… परंतू तू गर्विष्ठ, उन्मत्तपणाच्या दृष्टीच्या लोकांना खाली आणतोस ! (स्तोत्र १८:२७ब युएलटी)

व्यक्ती गर्विष्ठ आहे असे उन्मत्तपणाची दृष्टी दाखविते.

देव गर्विष्ठ पुरुषाला दीन करतो, व नम्र वृत्तीच्या मनुष्याला वाचवितो. (ईयोब २२:२९ युएलटी)

नम्र वृत्ती दर्शविते की व्यक्ती दीन आहे

मस्तक, शासक, पुढारी, इतरांवर अधिकार असलेल्या व्यक्तीला दर्शविते

प्रत्येक कुळातील पुरुष, पुर्वजांच्या घराण्यातला प्रमुख, आपल्या कुळातील पुढारी म्हणून तुझ्याबरोबर सेवा करावी (गणना १:४ युएलटी)

त्याने सर्वकाही आपल्या पायाखाली ठेवले व त्याला सर्वांचे मस्तक म्हणून मंडळीला दिले, जी त्याचे शरिर आहे, जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याची परिपुर्णता. (इफिस १:२२-२३ युएलटी)

धनी एखाद्याला कृती करण्यास उत्तेजिक करण्याच्या कोणत्याही गोष्टीला दर्शवितो

कोणीही दोन धन्याची, कारण तो एकाचा द्वेश करील व दुसऱ्यावर प्रीती करील, किंवा एकाशी निष्ठावान असेल व दुसऱ्याचा तिरस्कार करील. तुम्ही देवाची व धनाची सेवा करू शकत नाही. (मत्तय ६:२४ युएलटी)

देवाची सेवा करणे म्हणजे देवाकडून प्रेरणा घेणे. पैशाची सेवा करणे म्हणजे पैशाने प्रेरित होणे.

मुख म्हणजे भाषण किंवा शब्द

मुर्खाचे मुख हे त्याचा नाश आहे. (नीतिसुत्रे १८:७ युएलटी)

मी माझ्या मुखाने तुला बळ दिले असते. (ईयोब १६:५ युएलटी)

या संदर्भामध्ये मुख एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याला संदर्भित करते

नाम व्यक्तीकडे असलेल्या नावाला दर्शविते

“आपला देव शलमोनाचे नाव आपल्या नावापेक्षा श्रेष्ठ करो, व त्याचे सिंहासन आपल्या सिंहासनाहून मोठे करो.” (१ राजे १:४७ युएलटी)

परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी माझ्या थोर नामाची शपथ वाहीली आहे,”. संपुर्ण मिसर देशाततील कोणताही यहुदी पुरुषाच्या मुखात “माझे नाव निघणार नाही .” (यिर्मया ४४:२६ युएलटी)

एखाद्याचे नाव महान आहे, याचा अर्थ असा की तो महान आहे.

तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यात आनंद मानतात त्यांच्या प्रार्थनेकडे तुझे कान दे (नहेम्या १:११ युएलटी)

एखाद्याच्या नावाची भीती बाळगणे म्हणजे त्याचा सन्मान करणे.

नाव एखाद्याची कीर्ती किंवा प्रतिष्ठा यास दर्शविते

तुम्ही यापुढे आपल्या भेटवस्तू आणि आपल्या मूर्तींसह माझे पवित्र नाव अपवित्र करणार नाही. (यहेज्केल २०:३९ युएलटी)

देवाच्या नावाचा अपमान करणे म्हणजे त्याच्या प्रतिष्ठेला दाग लावणे, म्हणजेच लोक त्याच्याबद्दल कसे विचार करतात यास अपवित्र करणे.

कारण तू जे राष्ट्रांमध्ये अपवित्र केले, ते मी माझे थोर नाम पवित्र करील… (यहेज्केल ३६:२३ युएलटी)

देवाचे नाव पवित्र करणे म्हणजे देव पवित्र आहे हे लोकांना दाखवून देणे.

तुझा देव परमेश्वर याच्या नावामुळे तुझे सेवक फार दुर देशाहून आले आहेत, कारण आम्ही त्याच्याविषयी व त्याने मिसर देशात केलेल्या सर्व गोष्टींविषयी ऐकल आहे. (यहोशवा ९:९ युएलटी)

वास्तविकता अशी आहे की ते पुरुष म्हणाले त्यांनी परमेश्वराविषयी ऐकले, हे “परमेश्वराच्या नावामुळे” म्हणजे परमेश्वराच्या कीर्तीमुळे यास दर्शविते.

नाव एखाद्याची शक्ती, अधिकार, पद, किंवा स्थिती यास दर्शविते

अहश्वेरोश राजाच्या नावात ते लिहिण्यात आले, व ते राजाच्या मुद्रीकेने मोहरबंद केले गेले. (एस्तेर ३:१२ब युएलटी)

नाक क्रोधास दर्शविते

तेव्हा परमेश्वरा तुझ्या फटकारण्याने … तुझ्या तुझ्या नाकपुड्यातील श्वासाच्या झपाट्याने पृथ्वीचे पाय उघडे पडले . (स्तोत्र १८:१५ युएलटी)

तुझ्या नाकपुड्यातील झपाट्याने जलाशयाची रास झाली. (निर्गम १५:८अ युएलटी)

त्याच्या नाकपुड्यातुन धुर निघत होता, व जळता अग्नी त्याच्या मुखातून निघत होता.(२ शमुवेल २२:९अ युएलटी)

परमेश्वर, परमेश्वर, देव दयाळू व कृपाळू, मंदक्रोध असा आहे … (निर्गम ३४:६अ युएलटी)

इब्री भाषेत, गरम झालेले नाक, श्वासाचा झपाटा किंवा एखाद्याच्या नाकपुड्यांतून येणारा धूर यासारख्या प्रतिमांसहित क्रोधाला दर्शविते. “गरम नाक” याविरुध्द “लांब नाक” आहे. इब्री साहित्यातील “मंदक्रोध” हा वाक्यांशाचा अर्थ “लांब नाक” असा आहे. एक लांब नाक धीरास दर्शविते, म्हणजे त्या व्यक्तीचे नाक गरम होण्यास बराच वेळ लागतो.

पुत्र प्राण्याच्या संततीला दर्शवते

आणि त्याने पत्रे ( घोडेस्वार, सरकारी खेचर, सांडणींच्या स्वाराद्वारे) पाठविले … (एस्तेर ८:१०अ युएलटी)

कश्याचातरी पुत्र हे एखाद्या गोष्टीचे गुण सामायिक करणाऱ्या एखाद्या वस्तलु दर्शविते

कोणतेच दुष्टाचे पुत्र त्याच्यावर अत्याचार करणार नाही. (स्तोत्र ८९:२२ब युएलटी)

दुष्ट व्यक्ती हा दुष्टाचा पुत्र आहे .

बंदिवानाच्या आरोळ्या तुमच्यासमोर येवो; तुझ्या बळाच्या सामर्थाने मृत्युच्या पुत्रांचा बचाव कर. (स्तोत्र ७९:११ युएलटी)

येथे मृत्यूचे पुत्र असे लोक आहेत जे इतरांना मारण्याचा कट करतात.

आपणसुद्धा पुर्वी आपल्या शरीराच्या वाईट वासनांप्रमाणे वागले, आपल्या शरिराच्या व मनाच्या इच्छा पुर्ण करत होते. इतरांप्रमाणे आम्ही स्वभावाने क्रोधाची मुले होतो. (इफिस २:३ युएलटी)

येथे असलेले क्रोधाची मुले हे आहेत ज्याच्यावर देव क्रोधाविष्ट आहे.

जीभ एक व्यक्ती किंवा लोकांच्या समुहाद्वारे बाेलली जाणाऱ्या भाषेला दर्शवते

प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात राज्य करावे, व आपल्या लोकांच्या भाषेत बोलावे. (एस्तेर १:२२ब युएलटी)

भाषांतरातील पध्दती

भाषांतर पध्दती बायबलसंबंधी प्रतिमा सार्वजनिक नमुने.