mr_ta/translate/bita-animals/01.md

87 lines
11 KiB
Markdown

बायबलच्या काही भागांमध्ये शरीराचे भाग आणि मानवी गुणधर्म यांचा समावेश आहे. सर्व मोठ्या अक्षरातील शब्द कल्पना दर्शवतात. हा शब्द ज्या प्रत्येक वचनामध्ये प्रतिमा आहे त्यामध्ये शब्द अपरिहार्यपणे दिसत नाही, परंतु शब्द प्रस्तुतीकरण करतो अशी कल्पना आहे.
#### प्राण्यांची शिंगे ताकद दर्शवतात
>माझा देव जो माझा दुर्ग , त्याचा आश्रय मी करतो;
>तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरूज, माझे शरणस्थान आहे;
>माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला वाचवतोस. (2 शमुवेल 22:3 IRV)
"माझ्या तारणाचे शिंग" मला वाचवण्यात बलवान आहे
> मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन. (स्तोत्र 132:17 IRV)
"दाविदाचे शिंग" राजा दाविदाच्या सैन्याची ताकत आहे.
#### पक्षी धोक्यात असलेल्या आणि निराधार असलेल्या लोकांना प्रतिनिधित्व करतात.
याचे कारण असे की काही पक्ष्यांना सहज पकडले जाते.
>निष्कारण बनलेल्या माझ्या वैर्‍यांनी पक्ष्याचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे. (विलापगीत 3:52 IRV)
>ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला,
>ज्याप्रमाणे फासेपारध्याच्या हातून पक्ष्याला, (नीतिसूत्रे 6:5 IRV)
पारधी हा व्यक्ती आहे जो पक्ष्यांना पकडतो, आणि पाश हा सापळा आहे.
>आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशांतून मुक्त झाला आहे;
>पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. (स्तोत्र 124:7 IRV)
#### मांस खाणारे पक्षी वेगाने आक्रमण करणाऱ्या शत्रूंचे प्रतिनिधित्व करतात
हबक्कूक व होशेयमध्ये, इस्राएलांच्या शत्रूंनी येऊन त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्यांची गरुडाशी तुलना केली.
<blockquote> त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्‍या गरुडासारखे ते धावतात. (हबक्कूक 1:8 IRV) </blockquote>
>गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल,
>... इस्राएलाने चांगल्याचा धिक्कार केला आहे
>; शत्रू त्याच्या पाठीस लागेल. (होशेय 8:1,3 IRV)
यशयामध्ये, देवाने एका विशिष्ट विदेशी राजाला एका पक्ष्याचे नाव म्हटले कारण तो लवकर येऊन इस्राएलाच्या शत्रूंवर हल्ला करेल.
>माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, (यशया 46:11 IRV)
#### पक्ष्यांचे पंख सुरक्षा दर्शवितात
याचे कारण पक्षी त्यांच्या पिंजऱ्यांपर्यंत त्यांच्या धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करतात.
>मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव,
>कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात. (स्तोत्र 17:8-9 IRV)
येथे पंख कशा प्रकारे संरक्षणाचे प्रतिनिधित्व करतात याचे आणखी एक उदाहरण आहे.
>हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर;
>माझा जीव तुझा आश्रय करतो;
>ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन. (स्तोत्र 57:1 IRV)
#### धोकादायक प्राणी धोकादायक व्यक्ती दर्शवितात
स्तोत्रसंहितांमध्ये दाविदाने त्याच्या शत्रूंना सिंहासारखे म्हटले.
>माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे;
> माझ्याभोवती माझे शत्रू आहेत,
>ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत,
>ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.
>देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस (स्तोत्र 57:4 IRV)
पेत्राने सैतानाला गर्जणारा सिंह असे बोलावले.
>सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. (1 पेत्र 5:8 IRV)
मत्तयमध्ये, येशूने खोट्या संदेष्ट्यांना लांडगे म्हटले कारण त्यांच्या खोटया आशेमुळे लोकांची झालेली हानी.
>खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. (मत्तय 7:15 IRV)
मत्तयमध्ये, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने धार्मिक नेत्यांना विषारी सांप म्हटले कारण त्यांच्या खोटया आशेमुळे लोकांची झालेली हानी.
>परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले? (मत्तय 3:7 IRV)
#### गरुड सामर्थ्य दर्शविते
>तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो;
>म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. (स्तोत्र 103:5 IRV)
<blockquote> कारण परमेश्वर म्हणतो, "पहा, शत्रू मावबावर आपले पंख पसरण्यासाठी, गरुडारखा उडून जाईल." (यशया 48:40 IRV) (wrong verse plz check it.) </blockquote>
#### मेंढरे किंवा मेंढरांचा कळप जे लोकांना प्रतिनिधित्व करते किंवा धोका पत्करतात
>माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत; त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यांना बहकवले आहे; (यिर्मया 50:6 IRV)
<blockquote>नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले. त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले. (स्तोत्र 78:52 IRV) </blockquote>
>“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा;
>शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर. (यिर्मया 50:17 IRV)
<blockquote>लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे भोळे असा. माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील. (मत्तय 10:16 IRV) </blockquote>