mr_ta/translate/translate-versebridge/01.md

8.8 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

क्वचित प्रसंगी, आपण अनलॉक लिटरल बायबल (IRV) किंवा अनलॉक डायनेमिक बायबल (IEV) मध्ये दोन किंवा अधिक वचन संख्या एकत्रित केली जाते, जसे की 17-18. यालाच वचन पूल म्हणतात. याचा अर्थ, वाचानांमधील माहितीची पुनर्रचना झाली ज्यामुळे कथा किंवा संदेश अधिक सहजपणे समजला जाऊ शकतो.

29 </ sup> हे होरोन लोकांची कुळे: लोटान, शोबाल, जिबोन आणि अना, 30 </ sup> दीशोन, एसर, दीशान: हे सेईरा या देशात त्यांच्या टोळ्यांच्या यादीनुसार होरोनचे समूह आहेत. (उत्पत्ती 26: 29-30 IRV)

29-30 होर वंशातील लोक सेईरा या गावी राहिले. लोटान, शोबाल, जिबोन, अना, दीशोन, एसर व दिश्पान ही लोक गटांची नावे आहेत. (उत्पत्ती 26:29-30 IEV)

IRV पाठात, 29 ते 30 वचने वेगळी आहेत, आणि सेईरामधील राहणा-या लोकांची माहिती वचन 30 च्या शेवटी आहे. IEV मजकूरात, यातील वचने सामील होतात, आणि सेईरामध्ये राहणाऱ्या त्यांच्याविषयीची माहिती सुरुवातीला आहे बऱ्याच भाषांसाठी ही माहितीचा अधिक तार्किक क्रम आहे.

बायबलमधील उदाहरणे

कधीकधी IRVकडे स्वतंत्र वचने असतात तर IEVचे एक वचन पूल असते.

4 तरीपण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून द्यावा म्हणून देत आहे त्यात तो अवश्य आशीर्वाद देईल, 5 मात्र तुझा देव परमेश्वर याची वाणी तू मन:पूर्वक ऐकली पाहिजेस आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस. (अनुवाद 15:4-5 IRV)

4-5 तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून द्यावा म्हणून देत आहे त्यात तो अवश्य आशीर्वाद देईल. आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळल्यात कि ज्या आज मी तुम्हांला देत आहे तर तुमच्यामध्ये कोणीही गरीब राहणार नाही. (अनुवाद 15:4-5 IEV)

IRVमध्ये काही वचन पूल देखील आहेत.

17-18 एज्राचे पुत्र येथेर, मेरेद, येफेर, व यालोन. फारोची कन्या बिथ्या जी मेरेदाने केली होती तिची हि संतती, तिला मिर्याम, शम्माय व एष्टमोवाचा बाप इश्बह हे झाले. त्याच्या यहूदीण बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकूथीएल हे झाले. (1 इतिहास 4:17-18 IRV)

IRVने अधोरेखित केलेली वचन 18 ते 17 अधिक स्पष्टपणे दर्शविले जे बिथ्या याच्या मुलाचे होते. येथे मूळ क्रम आहे, जे बऱ्याच वाचकांना गोंधळात टाकणारे आहे:

17 एज्राचे पुत्र: येथेर, मेरेद, येफेर, व यालोन. ती गर्भवती होवून मिर्याम, शम्माय व एष्टमोवाचा बाप इश्बह हे झाले. 18 त्याच्या यहूदीण बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकूथीएल हे झाले. फारोची कन्या बिथ्या याचे ते पुत्र आहेत जिच्याशी मेरेदाने लग्न केले. (1 इतिहास 4:17-18 टीएनके)

भाषांतर सूचना.

माहिती आपल्या वाचकांसाठी स्पष्ट होईल अशा प्रकारे क्रम करा.

  1. एखाद्या वचनातील माहिती आधीच्या वचनातील माहिती आधी ठेवल्यास, दोन वचन क्रमांकांमध्ये एक संयोगचिन्ह ठेवा.
  2. जर IRVकडे वचन पूल असेल, पण दुसरे बायबल आपण वापरत नसल्यास, आपण आपल्या भाषेसाठी सर्वोत्तम कार्य करणारा क्रम निवडू शकता.

TranslationStudio APP मधील अध्याय चिन्हांकित कसे करायचे ते पहा.

भाषांतर पद्धतींचे उदाहरण लागू

  1. एखाद्या वाचनातील माहिती आधीच्या वचनातील माहिती आधी ठेवली असेल तर पहिल्या वचनाच्या आधी वचन संख्या त्यांना दरम्यान संयोगचिन्हासह () ठेवले.
  • **2 तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे त्यात तुझ्यासाठी तीन नगरे राखून ठेव. ***3 मनुष्यवध करणाऱ्या कोणालाही तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर कारण आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे त्या देशाचे तीन भाग कर. ** (अनुवाद 19:2-3) *2-3 त्या तीन नगरांना तीन भागात विभाजित केले पाहिजे जे तो तुला देत आहे. त्यानंतर प्रत्येक भागातील एक शहर निवडा. आपण चांगले रस्ते बनवायला पाहिजेत की लोक त्या शहरे सहज मिळवू शकतील. जो कोणी दुसऱ्या व्यक्तीला जिवे मारतो त्याला त्यापैकी एका शहरात सुरक्षित ठेवता येईल. (अनुवाद 19:2-3 IEV)
  1. जर IRVकडे वचन पूल असेल, पण दुसरे बायबल आपण वापरत नसल्यास, आपण आपल्या भाषेसाठी सर्वोत्तम कार्य करणारा क्रम निवडू शकता.