mr_ta/translate/figs-merism/01.md

6.2 KiB

व्याख्या

मेरिजम हे अलंकार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या दोन अधिक भागांबद्दल बोलून काहीतरी म्हटले जाते. अत्यंत भागांचा संदर्भ देऊन, वक्ता त्या भागांमधील सर्व गोष्टी समाविष्ट करणे इच्छित आहे.

प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.” (प्रकटीकरण 1:8, IRV)

“मी अल्फा आणि ओमेगा आहे, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट. (प्रकटीकरण 22:13, IRV)

अल्फा आणि ओमेगा ग्रीक वर्णमालाचे पहिले आणि शेवटचे अक्षरे आहेत. हे एक मेरिजम आहे जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वकाही समाविष्ट करते. याचा अर्थ अनंत आहे.

स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो.... (मत्तय 11:25 IRV)

स्वर्ग आणि पृथ्वी एक मेरिजम आहे ज्यामध्ये अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट समाविष्ट आहे

कारण हा भाषांतर मुद्दा आहे

काही भाषा मेरिजम वापरत नाहीत. त्या भाषांतील वाचकांना असे वाटते की वाक्यांश फक्त उल्लेख केलेल्या गोष्टींना लागू होतो. त्यांना कदाचित हे लक्षात येणार नाही की त्या दोन गोष्टी आणि त्यामधील सर्व गोष्टींचा उल्लेख आहे.

बायबलमधील उदाहरणे

पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते. (स्तोत्र 113:3 IRV)

हा अधोरेखित वाक्यांश एक मेरिजम आहे कारण तो पूर्व आणि पश्चिम आणि सर्वत्रच्या दरम्यानबद्दल बोलतो. याचा अर्थ "सर्वत्र".

जे त्याला आदर देतील त्यांना तो आशीर्वाद देईल, दोन्ही तरुण आणि वृद्ध . (स्तोत्र 115: 13) wrong verse plz check it

अधोरेखित शब्दसंपत्ती मेरिजम आहे कारण हे बोलते, जुने लोक आणि तरुण लोक आणि प्रत्येकादरम्यान. याचा अर्थ "प्रत्येकजण".

भाषांतर रणनीती

मेरिजम नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेत योग्य अर्थ देईल तर त्याचा वापर करण्याचा विचार करा. जर नसल्यास, येथे काही इतर पर्याय आहेत.

  1. भागांचा उल्लेख न करता मेरिजम म्हणजे काय ते ओळखा.
  2. मेरिजम म्हणजे काय ते पहा आणि भागांचा समावेश करा.

भाषांतर पद्धतींचे उदाहरण लागू

  1. भागांचा उल्लेख न करता मेरिजम म्हणजे काय ते ओळखा.
  • स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो.... (मत्तय 11:25 IRV)

    • सर्व गोष्टींचा प्रभु मी तुझे उपकार मानतो....
  • पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे. (स्तोत्र 113:3 IRV) *सर्व ठिकाणी परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे.

  1. मेरिजम म्हणजे काय ते पहा आणि भागांचा समावेश करा.
  • स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो.... (मत्तय 11:25 IRV)

    • स्वर्गात आणि पृथ्वीवरील जे काही आहे त्यासह सर्वकाही प्रभु मी तुझे उपकार मानतो....
  • जे त्याला आदर देतील त्यांना तो आशीर्वाद देईल, दोन्ही तरुण आणि वृद्ध . (स्तोत्र 115:13) wrong verse plz check it

जे सर्व त्याला आदर देतील त्यांना तो आशीर्वाद देईल, दोन्ही तरुण आणि वृद्ध .