mr_ta/translate/figs-euphemism/01.md

5.9 KiB

वर्णन

व्याजोक्ती सौम्य किंवा विनम्र मार्ग आहे जो कि एखाद्या गोष्टीचा उल्लेख करणे जे अप्रिय, लाजिरवाणी किंवा सामाजिक अस्वीकार्य आहे, जसे मृत्यू किंवा क्रियाकलाप जे खासगीरित्या केले जातात.

व्याख्या

...गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे मुलगे यांचे मृतदेह सापडले. (1 इतिहास 10:8 IRV)

याचा अर्थ शौल आणि त्याचे मुलगे "मृत होते". हे व्याजोक्ती आहे कारण शौल व त्याचे पुत्र पडले होते हे महत्त्वाचे नव्हते पण ते मृत झाले; कधीकधी लोकांना मृत्यूविषयी प्रत्यक्ष बोलायला आवडत नाहीत कारण ते अप्रिय आहे.

कारण हा भाषांतर मुद्दा आहे

वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या व्याजोक्ती वापरतात. लक्ष्यित भाषा स्त्रोत भाषेप्रमाणेच समान व्याजोक्ती वापरत नसल्यास, वाचकांना याचा अर्थ काय समजत नाही आणि ते कदाचित विचार करतील की लेखक केवळ शब्दाचाच अर्थ सांगतो.

बायबलमधील उदाहरणे

....जिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दीशेकरता गेला.... (1 शमुवेल 24:3 IRV)

मूळ श्रोत्यांना समजले असते की शौल शौचालय म्हणून वापर करण्यासाठी त्या गुहेत गेला, परंतु लेखकास त्यांना अपमान करणे किंवा विचलित करणे टाळयाचे होते, म्हणून ** त्याने स्पष्टपणे सांगितले नाही की शौलाने काय केले किंवा गुहेत काय सोडले.

तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल, कारण मी पुरुषासोबत निजली नाही?” (लूक 1:34 IRV)

विनयशील होण्याकरिता, मरीया म्हणते की तिने कधीही माणसाबरोबर संभोग केला नव्हता.

भाषांतर रणनीती

जर व्याजोक्ती नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेत योग्य अर्थ देत असेल तर ती वापरण्याचा विचार करा. जर नसल्यास, येथे काही इतर पर्याय आहेत.

  1. आपल्या स्वत: च्या संस्कृतीचे व्याजोक्ती वापरा.
  2. जर ती आक्रमक नसेल, तर व्याजोक्तीशिवाय माहिती सांगा.

भाषांतर पद्धतींचे उदाहरण लागू

  1. आपल्या स्वत: च्या संस्कृतीचे व्याजोक्ती वापरा.
  • ....जिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दीशेकरता गेला.... (1 शमुवेल 24:3 IRV) - काही भाषा यासारख्या व्याजोक्ती भाषा वापरु शकतात:

    • "...जिथे एक गुहा होती. शौल गुहेमध्ये खड्डा पाडण्याकरिता गेला......"
    • "...जिथे एक गुहा होती. शौल गुहेमध्ये काही वेळ एकटा थांबण्याकरिता गेला......"
  • तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल, कारण मी पुरुषासोबत निजली नाही?” (लूक 1:34 IRV)

    • तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल, कारण मला पुरुष ठाऊक नाही?” - (मूळ ग्रीक भाषेत हा व्याजोक्ती वापरण्यात आला आहे)
  1. जर ती आक्रमक नसेल, तर व्याजोक्तीशिवाय माहिती सांगा.
  • ...गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे मुलगे पडलेले सापडले. (1 इतिहास 10:8 IRV) *...."गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे मुलगे यांचे मृतदेह सापडले."