mr_ta/translate/bita-manmade/01.md

44 lines
4.7 KiB
Markdown

बायबलमधील मानव-निर्मित वस्तूंचा समावेश असलेल्या काही प्रतिमा वर्णक्रमानुसार खाली सूचीबद्ध केल्या आहेत. सर्व मोठ्या अक्षरातील शब्द प्रतिमा दर्शवतो. हा शब्द ज्या प्रत्येक वचनामध्ये प्रतिमा आहे त्यामध्ये शब्द अपरिहार्यपणे दिसत नाही, परंतु शब्द प्रस्तुतीकरण करतो अशी कल्पना आहे.
#### पितळ सामर्थ्य दर्शवितात
त्यामुळे माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात. (स्तोत्र 18:34 IRV)
#### बंधने नियंत्रण प्रतिनिधित्व करतात
>चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून टाकू (स्तोत्र 2:3 IRV)
#### कपडे नैतिक गुण (भावना, वृत्ती, आत्मा, जीवन) दर्शवितात.
देव मला सामर्थ्याचा कमरबंद देतो. (स्तोत्र 18:32 IRV)
<blockquote>नीतिमत्ता त्याचे वेष्टन, आणि सत्यता त्याचा कमरबंद होईल. (यशया 11:5 IRV) </blockquote>
माझे विरोधी अपमानाने व्याप्त होतील. झग्याप्रमाणे ते लज्जा पांघरतील. (स्तोत्र 109:29 IRV)
मी त्याच्या वैर्‍यांना लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल.” (स्तोत्र 132:18 IRV) </blockquote>
#### पाश (तारेद्वारे कार्य करणारे पक्ष्यांसाठी हलकी जाळी) मृत्यूचे प्रतिनिधित्व करतात.
>कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. (स्तोत्र 91:3 IRV)
<blockquote>मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले, (स्तोत्र 116:3 IRV) </blockquote>
दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टले, (स्तोत्र 119:61 IRV)
<blockquote> दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, (स्तोत्र 119:110 IRV) </blockquote>
>दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (स्तोत्र 9:16 IRV)
तर ते त्या राष्ट्रांत मिसळले, आणि त्यांचे आचार शिकले, त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली; त्या त्यांना पाशरूप झाल्या. (स्तोत्र 106:35-36 IRV)
या प्रकरणात पाश दुराचारपणा करण्याचा संकल्प होता, ज्यामुळे मृत्युकडे जाते.
#### एक तंबू एक घर, भवन, एखाद्याच्या घरात राहणारे लोक, वंशांना दर्शवते.
परंतु देव तुझा नाश करील; तो तुला धरून डेर्‍यातून खेचून काढील. (स्तोत्र 52:5 IRV)
<blockquote>दुर्जनांचे घर कोसळते, सरळांचा तंबू चांगला राहतो (नीतिसूत्रे 14:11 IRV) </blockquote>
>वात्सल्याचे सिंहासन स्थापले आहे; त्यावर दाविदाच्या डेर्‍यात कोणीएक सत्यनिष्ठ विराजमान होईल; (यशया 16:5 IRV)