mr_ta/checking/complete/01.md

3.1 KiB

संपूर्ण भाषांतर

या विभागातील उद्देश हा भाषांतर पूर्ण असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आहे. या विभागात, नवीन भाषांतर स्त्रोत भाषांताराशी तुलना करणे आवश्यक आहे. आपण दोन भाषांताराची तुलना केल्यावर स्वतःला हे प्रश्न विचारा:

  1. भाषांतरात त्याचा कोणताही भाग गहाळ आहे काय? दुसऱ्या शब्दात, भाषांतरात भाषांतर केलेल्या पुस्तकातील सर्व घटनांचा यात समावेश आहे का?
  2. भाषांतरात भाषांतर केलेल्या सर्व वचनांचा यात समावेश आहे का? (आपण स्त्रोत भाषेच्या भाषांतराची वचन संख्या पाहता तेव्हा, सर्व वचने लक्ष्यित भाषेच्या भाषांतरणात समाविष्ट केले जातात का?) काहीवेळा भाषांतरामधील वचन क्रमांकांमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ, काही भाषांतरांमध्ये काही वचनांचे एकत्र केले जाते किंवा कधीकधी ठराविक वचनांना तळटीप ठेवली जाते. जरी स्त्रोत भाषांतर आणि लक्ष्यित भाषांतरामध्ये या प्रकारचे फरक असू शकतील, तरी लक्ष्यित भाषेचे भाषांतर अद्याप पूर्ण झाले आहे.
  3. भाषांतरात असे काही ठिकाणे आहेत जिथे काहीतरी बाहेर दिसत आहे किंवा स्त्रोत भाषेत भाषांतर पेक्षा वेगळे संदेश दिसत आहे? (शब्दरचना आणि क्रम भिन्न असू शकतात परंतु ज्या भाषेत भाषांतरकर्त्यांने वापरलेली भाषा स्त्रोत भाषेच्या भाषांतरासारखेच संदेश देईल).

जर एखादे असे ठिकाण असेल जेथे भाषांतर पूर्ण झाले नाही, तर त्याची नोंद करा म्हणजे आपण त्याचा भाषांतर कार्यसंघाशी चर्चा करू शकता.