mr_obs/content/47.md

9.5 KiB

फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला

OBS Image

शौल संपूर्ण रोमन साम्राज्यामधून प्रवास करत असतांना, त्याने आपल्या "पौल" ह्या रोमन नावाचा उपयोग करु लागला.एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले.शहराच्या वेशीबाहेर नदीच्या काठावर प्रार्थनेसाठी एकत्रित आलेल्या लोकांकडे ते गेले.तेथे त्यांना लुदिया नावाची एक व्यापारी स्त्री भेटली.तिचे देवावर प्रेम होते व ती देवाची भक्ती करणारी होती.

OBS Image

देवाने लुदियाचे अःकरण उघडले व तिने येशूविषयीच्या संदेशावर विश्वास ठेविला, मग तिने आपल्या कुटुंबियांसहित बाप्तिस्मा घेतला.तिने पौल व सीला यांना आपल्या घरी बोलाविले, तेव्हा ते तिच्या कुटुंबासोबत राहिले.

OBS Image

पौल आणि सीला प्रार्थनेच्या स्थळी लोकांस वारंवार भेटले.दररोज ते त्या ठिकाणी जात असतांना, एक दासी व दुष्टात्माग्रस्त मुलगी त्यांच्यामागे चालू लागली.ह्या दुष्टात्म्याच्या आधारे ती लोकांचे भविष्य सांगत असे, अशा प्रकारे भविष्य सांगून ती आपल्या धन्यासाठी भरपूर मिळकत करुन देत असे.

OBS Image

ते रस्त्याने चालत असतांना ती गुलाम मुलगी ओरडत राहिली, "ही माणसे परात्पर देवाचे दास आहेत.ते तुम्हास तारणाचा मार्ग सांगत आहेत!"तिने असे अनेक वेळा केल्यामुळे पौलास त्रास झाला.

OBS Image

शेवटी एके दिवशी ती मुलगी ओरडू लागली, पौलाने तिच्याकडे वळून तिच्यामध्ये असणाऱ्या दूष्टआत्म्याला म्हटले, "येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा."आणि तत्काळ तो दूष्टआत्मा तिला सोडून निघून गेला.

OBS Image

हे पाहून त्या मुलीच्या धन्यांस खूप राग आला!त्यांच्या लक्षात आले की दुष्टात्म्याशिवाय ती मुलगी लोकांचे भविष्य सांगू शकत नव्हती.ह्याचा अर्थ तीने लोकांना त्यांचे भविष्य सांगावे म्हणुन लोक आता तिच्या मालकांस पैसे देणार नव्हते.

OBS Image

तेव्हा या मुलीच्या धन्यांनी पौल व सीला यांना रोमन अधिकाऱ्याकडे नेले व त्यांनी त्यांना मारहाण केली व तुरुंगामध्ये टाकले.

OBS Image

त्यांनी पौल व सीला यांना तुरूंगाच्या एकदम आतल्या ठिकाणी ठेवले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले.तरीही मध्यरात्रीच्या समयी, ते देवाची स्तुती करत होते व गीत गात होते.

OBS Image

अचानक, त्या ठिकाणी एक मोठा भूकंप झाला! तेव्हा तुरूंगाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले गेले, आणि कैद्यांचे साखळदंडही तुटून पडले.

OBS Image

तेव्हा तुरूंगाचा अधिकारी जागा झाला, आणि जेव्हा त्याने तुरूंगाचे दरवाजे उघडे पाहिले तेव्हा तो खूप भयभित झाला!त्याला वाटले की सर्व कैदी पळून गेले असतील, म्हणून तो आत्महत्या करणार होता.(त्यास माहीत होते जर कैदी निसटून गेले तर रोमी अधिकारी त्यास जीवे मारतील.)परंतु पौलाने त्यास ओरडून म्हटले, "थांब!स्वतःस इजा करून घेऊ नकोस.कारण आम्ही सर्व इथेच आहोत."

OBS Image

तुरूंगाचा अधिकारी पौल व सीलाकडे जात असतांना थरथर कापत होता, तो म्हणाला, "माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?"पौलाने उत्तर दिले, "प्रभु येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल."तेव्हा तुरूंगाधिकारी पौल व सीला यांना आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने त्यांच्या जखमा धुतल्या.पौलाने त्याच्या घरातील सर्व लोकांना येशूची सुवार्ता सांगितली.

OBS Image

तुरुंगाधिकारी आणि त्याचे सर्व कुटुंब यांनी येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला.तेव्हा तुरूंगाधिकाऱ्याने पौल व सीला यांना जेवण दिले, आणि त्यांनी एकत्र मिळुन आनंद केला.

OBS Image

दुसऱ्या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व सीला यांची सुटका केली व फिलिप्पै शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले.तेव्हा पौल व सीला यांनी लुदिया व इतर बंधूंना भेट दिली व नंतर त्यांनी ते शहर सोडले.येशूविषयीची सुवार्ता पसरत गेली व मंडळीची वाढ होत गेली.

OBS Image

पौल व इतर ख्रिस्ती पुढारी येशूची सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरांमधून प्रवास करत गेले.त्यांनी पुष्कळ पत्रे सुद्धा लिहीली व मंडळ्यातील विश्वासणा-यांना प्रोत्साहन व शिक्षण दिले.त्यांपैकी काही पत्रे बायबलमधील पुस्तके झाली.

बायबल कथाःप्रेषित 16:11-40