mr_obs/content/43.md

8.1 KiB

मंडळीची सुरूवात

OBS Image

येशू स्वर्गात गेल्यानंतर, येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे शिष्य यरूशलेमेतच राहिले.तेथील विश्वासणारे प्रार्थना करण्यासाठी वारंवार एकत्र येऊ लागले.

OBS Image

प्रत्येकवर्षी, वल्हांडणानंतर 50 दिवसांनी, यहूदी लोक पेंटेकॉस्ट नावाचा महत्वाचा दिवस साजरा करत.पेंटेकॉस्ट हा यहुदी लोकांचा हंगामाचा सण होता.जगातील सर्व यहूदी लोक यरुशलेमेत येऊन पेंटेकॉस्ट साजरा करत.यावेळी येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर सुमारे एक आठवड्यानंतर पेंटेकॉस्ट आला होता.

OBS Image

जेंव्हा सर्व विश्वासणारे एकत्र जमले होते एकाएकी ते बसले होते ती खोली सोसाट्याच्या वा-यासारख्या ध्वनीने भरून गेली.तेव्हा अग्निच्या ज्वालेसारख्या जिभा त्यांना सर्व विश्वासणा-यांच्या डोक्यावर दिसल्या.ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले व वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.

OBS Image

यरूशलेमेतील लोकांनी जेंव्हा हा आवाज ऐकला तेंव्हा हे काय आहे ते पाहाण्यासाठी आले.जेव्हा लोकांनी विश्वासणा-यांना देवाची आश्चर्यकर्मे प्रकट करतांना व त्यांच्याच मातृभाषेमध्ये बोलतांना ऐकले तेव्हा लोकांना फार आश्चर्य वाटले.

OBS Image

काही लोकांना वाटले की विश्वासणारे मद्यपान करून मस्त झाले आहेत.परंतु पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, "माझे बोलणे ऐका!ही माणसे मद्यपान करून मस्त झाली नाहीत!ह्याद्वारे योएल भविष्यवक्त्याने केलेली भविष्यवाणी पूर्ण होत आहे, देवाने म्हटले आहे "शेवटच्या काळामध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करील.'"

OBS Image

"अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुत कार्ये केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला माहीत आहेत.पण तुम्ही त्यास वधस्तंभावर खिळले!"

OBS Image

"जरी येशू मरण पावला होता, तरी देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले.ह्या घटनेद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण होते, ‘तू आपल्या पवित्रास कबरेमध्ये कुजू देणार नाहीस.’आम्ही ह्या गोष्टीविषय़ीचे साक्षीदार आहेत की देवाने येशूला मरणातून पुन्हा उठविले आहे."

OBS Image

येशू आता आपल्या देवपित्याच्या उजव्या बाजूस ऊंचावलेला आहे.आणि येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे त्याने आम्हासाठी पवित्र आत्मा पाठविला आहे.आता जे तुम्ही पाहाता व ऐकत आहात, त्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा करीत आहे.

OBS Image

"तुम्ही येशू ह्या मनुष्यास, वधस्तंभावर खिळले.परंतु आता तुम्हाला कळू द्या की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे!"

OBS Image

पेत्राचे भाषण ऐकणा-यांच्या मनाला टोचणी लागली.म्हणून त्यांनी पेत्र व अन्य प्रेषितांना विचारले, "बंधुजनहो, आम्ही आता काय करावे?"

OBS Image

पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील.मग तो तुम्हास पवित्र आत्म्याचे दान सुद्धा देईल."

OBS Image

तेव्हा सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेविला व ते येशूचे शिष्य झाले.त्यांनी बाप्तिस्मा घेतला व यरूशलेमेच्या मंडळीमध्ये सामिल झाले.

OBS Image

शिष्य प्रेषितांच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात व इतरांबरोबर प्रार्थना करण्यात तत्पर असत.ते आनंदाने एकत्र देवाची स्तुती करीत आणि त्यांचे सर्व काही समाईक होते.सर्व लोक त्यांना प्रसन्न असत.प्रत्येक दिवशी त्यांच्यामध्ये नवीन विश्वासणा-यांची भर पडत होती.

बायबल कथाःप्रेषित 2