mr_obs/content/42.md

9.5 KiB

येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो)

OBS Image

येशू मेलेल्यातून ज्या दिवशी उठला, त्या दिवशी त्याचे दोन शिष्य जवळच्या एका नगरामध्ये जात होते.ते चालत असतांना, येशूविषयी जे घडले होते त्याविषयी बोलत होते.त्यांनी येशू हा मसिहा आहे असा विश्वास ठेवला होता, परंतु येशूला मारण्यात आले होते.आता त्या स्त्रिया म्हणत होत्या की तो पुन्हा जिवंत झाला आहे.आता कशावर विश्वास ठेवावा हे त्यांना कळत नव्हते.

OBS Image

येशू त्यांच्या जवळ आला व त्यांच्याबरोबर चालू लागला, पण त्यांनी त्याला ओळखले नाही.ते कशाविषयी बोलत होते हे त्याने त्यांना विचारले, आणि त्यांनी त्याला कांही दिवसापुर्वी येशूविषयी घडलेल्या उल्लेखनीय गोष्टी सांगितल्या.त्यांना वाटले की ते एका अनोळख्या प्रवाशाबरोबर ज्याला यरूशलेममध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्याच्याशी बोलत आहेत.

OBS Image

तेव्हा येशूने त्यांना, देवाच्या वचनात मसिहाविषयी काय सांगितले आहे हे स्पष्ट करुन सांगितले.त्याने त्यांना आठवण करून दिली की संदेष्ट्यांनी सांगितले होते की मसिहा दुःख सोशील, त्यास जीवे मारतील, पण तीस-या दिवशी तो पुन्हा उठेल.जेव्हा ते दोघे जेथे त्यांना मुक्काम करावयाचा होता तेथे पोहोचले, तेव्हा संध्याकाळ होत आली होती.

OBS Image

त्या दोघांनी येशूला आपल्याबरोबर मुक्काम करण्याचा आग्रह केला व तो त्यांच्याबरोबर राहण्यास आत गेला.ते संध्याकाळच्या जेवणासाठी बसलेले असतांना, येशूने भाकर घेऊन देवाचा धन्यवाद केला व ती मोडली.अचानक तो येशू आहे हे त्यांनी ओळखले.परंतु त्या समयी, येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावला.

OBS Image

ती दोघे एकमेकांना म्हणू लागली, "तो येशू होता!आणि म्हणूनच तो देवाचे वचन आम्हाला उलगडा करून सांगत असतांना आपले अंतःकरण आतल्याआत उकळत होते!"तेव्हा लगेच, ते यरुशलेमेस परतले.त्यांनी येऊन शिष्यांना सांगितले की, "येशू जिवंत झाला आहे!आम्ही त्यास पाहिले आहे!"

OBS Image

शिष्य हे बोलत असतांनाच, येशूने त्या खोलीमध्ये स्वतःला प्रकट केले व म्हटले, "तुम्हास शांती असो!"शिष्यांना वाटले की ते भूत आहे, पण येशू म्हणाला, "तुम्ही भयभित होऊन शंका का घेता?माझ्या हाताकडे व पायाकडे पाहा.जसे मला शरीर आहे तसे भूतांना शरीर नसते."तो भूत नाही हे सिद्ध करण्यासाठी, त्याने त्यांस खाण्यासाठी काही आहे का ते विचारले.त्यांनी त्यांस शिजविलेला मासा दिला, आणि त्याने तो खाल्ला.

OBS Image

येशू म्हणाला, "मी तुम्हास सांगितले होते की माझ्याविषयी देवाच्या वचनामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणे अगत्याचे आहे."मग त्याने त्यांची अंतःकरणे उघडली, तेव्हा त्यांना देवाचे वचन कळले.तो म्हणाला, "अनेक वर्षांपूर्वी असे लिहिले होते की मसिहा दुःख सहन करील, त्यास मारतील व तीस-या दिवशी तो मरणातून पुन्हा उठेल.

OBS Image

"धर्मशास्त्रामध्ये हेही लिहिले होते की माझे शिष्य पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाची घोषणा करतील.ते यरूशलेमेपासून ह्या संदेशास आरंभ करतील, मग सर्व ठिकाणच्या सर्व लोकांकडे हा संदेश घेऊन जातील.तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आहात."

OBS Image

पुढील चाळीस दिवसांमध्ये, येशू अनेक वेळा शिष्यांना प्रकट झाला.एकदा तर तो 500 हून अधिक लोकांस एकाच वेळी प्रकट झाला.त्याने आपल्या शिष्यांना आपण जिवंत असल्याचे प्रमाण विविध प्रकारे दिले व त्यांना देवच्या राज्याविषयी शिकवण दिली.

OBS Image

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले आहे.म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.आणि आठवण ठेवा की मी नेहमी तुम्हाबरोबर आहे."

OBS Image

येशूच्या पुनरूत्थानानंतर चाळीस दिवसांनी येशूने शिष्यांस सांगितले, "जोपर्यंत माझा पिता तुम्हास सामर्थ्य देणारा पवित्र आत्मा तुम्हावर पाठवत नाही, तोपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका."मग येशू स्वर्गात गेला व मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले.सर्व गोष्टींवर अधिकार चालवण्यासाठी येशू देवाच्या उजवीकडे बसलेला आहे .

बायबल कथाःमत्तय 28:16-20; मार्क 16:12-20; लूक 24:13-53; योहान 20:19-23; प्रेषितांची कृत्ये 1:1-11