mr_obs/content/41.md

5.2 KiB

देव येशूला मेलेल्यातून उठवितो

OBS Image

सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर, विश्वास न ठेवणा-या यहूदी पुढा-यांनी पिलातास म्हटले, "तो खोटारडा, येशू म्हणाला होता की तो तीन दिवसांनंतर पुन्हा उठेन.कोणीतरी त्या कबरेवर पहारा ठेवणे अगत्याचे आहे, नाहीतर त्याचे शिष्य त्याचे शरीर चोरून नेतील व तो उठला आहे असे म्हणतील."

OBS Image

पिलात म्हणाला, "काही सैनिकांना घ्या व त्या कबरेभोवती तुमच्याने होईल तितका चांगला बंदोबस्त ठेवा."तेव्हा त्यांनी त्या कबरेच्या तोंडावरच्या धोंडीवरती शिक्कामोर्तब केले व तेथे सैनिकांना ठेवले यासाठी की कोणी येशूचे शरीर चोरू नये.

OBS Image

येशूला कबरेत ठेवल्यानंतरचा दुसरा दिवस हा शब्बाथ दिवस होता, त्या दिवशी यहूद्यांना कबरेकडे जाण्याची मनाई होती.तेव्हा शब्बाथाच्या दुस-या दिवशी पहाटेच, काही स्त्रिया सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेवर गेल्या त्यांनी ती त्याच्या उत्तरक्रियेसाठी तयार केली होती.

OBS Image

तेव्हा अचानक, एक मोठा भूकंप झाला.विजेसारखे रुप असणारा एक देवदूत स्वर्गातून प्रकट झाला.त्याने कबरेच्या तोंडाशी असलेली धोंड बाजूला सारली व त्यावर बसला.तेव्हा त्या कबरेवर पहारा करत असलेल्या सैनिकांना फार भिती वाटली व ते मेल्यासारखे जमिनीवर पडले.

OBS Image

जेव्हा त्या स्त्रिया कबरेजवळ आल्या, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, "भिऊ नका.येशू येथे नाही.त्याने सांगितल्याप्रमाणे तो मेलेल्यातून उठला आहे!पाहा, ज्या कबरेत त्याला ठेवले होते ती जागा."तेव्हा त्या स्त्रियांनी आत जाऊन जेथे येशूचे शरीर ठेवले होते, ती जागा पाहिली.त्याचे शरीर त्या ठिकाणी नव्हते!

OBS Image

तेव्हां देवदूत त्यां स्त्रियांना म्हणाला, "जा, आणि शिष्यांना सांगा, 'येशू मरणातून उठला आहे व तो तुमच्यापुढे गालीलास जात आहे.'"

OBS Image

हे ऐकून स्त्रियांना फार भिती वाटली व आनंदही झाला.त्यांनी धावत जाऊन शिष्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली.

OBS Image

त्या स्त्रिया शिष्यांना ही बातमी सांगायला जात असतांना, येशूने त्यांना दर्शन दिले, आणि त्यांनी त्याला नमन केले.येशू म्हणाला, "भिऊ नका.जा आणि माझ्या शिष्यांना गालीलात यायला सांगा.मी त्यांना तेथे भेटेन."

बायबल कथाःमत्तय 27:62-28:15; मार्क 16:1-11; लूक 24:1-12; योहान 20:1-18