mr_obs/content/38.md

63 lines
12 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains invisible Unicode characters

This file contains invisible Unicode characters that are indistinguishable to humans but may be processed differently by a computer. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# ‌‌‌येशूला विश्वासघाताने धरुन देण्यात येते
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-01.jpg)
‌‌‌दरवर्षी, यहूदी वल्हांडण सण साजरा करत असत.‌‌‌देवाने मिसर देशातील गुलामगिरीतून शेकडोवर्षापुर्वी त्यांच्या पुर्वजांची कशी सुटका केली, याचा आनंद साजरा करण्यासाठी यहूदी लोक हा सण पाळत.‌‌‌येशूच्या प्रचारकार्यास उघडपणे आरंभ झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी येशूने आपल्या शिष्यांस सांगितले की यरुशलेममध्ये त्यांजबरोबर वल्हांडण साजरा करावा अशी त्याची इच्छा आहे, आणि त्यानंतर तो तेथे मारला जाणार आहे असेही त्याने सांगितले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-02.jpg)
‌‌‌येशूच्या शिष्यांपैकी यहूदा नावाचा एक शिष्य होता.‌‌‌यहूदा हा प्रेषितांच्या पैशाची थैली सांभाळणारा खजिनदार होता, पण तो पैशाचा लोभी असल्यामुळे अनेकदा त्यातून पैसे चोरत असे.‌‌‌येशू आणि शिष्य यरुशलेममध्ये आल्यानंतर, यहूदा धार्मिक पुढा-यांना जाऊन भेटतो व पैशांच्या मोबदल्यात येशूला पकडून देण्याविषयी बोलतो. ‌‌‌त्याला ठाऊक होते की यहूदी पुढारी येशू हा मशीहा आहे हे नाकारत होते व त्यास मारण्याचा कट रचत होते.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-03.jpg)
‌‌‌तेंव्हा महायाजक व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले.‌‌‌संदेष्ट्यांनी सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी हे सर्व काही झाले.‌‌‌यहूदा त्यांच्याशी सहमत झाला, व पैसे घेऊन गेला.‌‌‌तेंव्हापासून तो येशूला धरुन देण्याची वाट पाहू लागला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-04.jpg)
‌‌‌यरुशलेमध्ये, येशूने आपल्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा केला.‌‌‌वल्हांडण भोजना दरम्यान येशूने भाकर घेऊन ती मोडिली. व तो म्हणाला, ‘‘घ्या आणि खा.’’‌‌‌हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे.‌‌‌माझ्या आठवणीसाठी हे करा.’’‌‌‌त्याचप्रकारे, येशूने म्हटले की त्याचे शरीर त्यांच्यासाठी बलिदान म्हणून देण्यात येईल.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-05.jpg)
‌‌‌मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ह्यातुन प्या.‌‌‌हा माझे नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे.‌‌‌जेंव्हा तुम्ही हे पिता, तेंव्हा हे माझ्या आठवणीसाठी हे करा.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-06.jpg)
‌‌‌मग येशू शिष्यांना म्हणाला, ‘‘तुम्हापैकी एक माझा विश्वासघात करील.’’‌‌‌तेंव्हा त्यांना धक्का बसला आणि ते विचारु लागले की अशी गोष्ट कोण करील.‌‌‌येशू म्हणला, ‘‘ज्याला मी ही भाकर मोडून देईल, तोच माझा विश्वासघात करील.’’‌‌‌मग त्याने यहूदास ती भाकर मोडून दिली.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-07.jpg)
‌‌‌यहूदाने भाकर घेतल्याबरोबर, सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केला.‌मग येशूला पकडून देण्यासाठी ‌‌यहूदा तेथून निघून यहूदी पुढा-यांना मदत करण्यासाठी गेला.‌‌‌तो रात्रीचा समय होता.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-08.jpg)
‌‌‌भोजनानंतर, येशू आपल्या शिष्यांसोबत जैतुनाच्या डोंगराकडे गेला.‌‌‌येशू म्हणाला, ‘‘आज रात्री तुम्ही सर्व मला सोडून जाल.‌‌‌असे लिहिले आहे की, मी मेंढपाळास मारीन व मेंढरांची दाणादाण करीन.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-09.jpg)
‌‌‌पेत्राने उत्तर दिले, ‘‘जरी सर्वांनी तुला सोडिले, तरी मी तुला सोडणार नाही!’’‌‌‌तेंव्हा येशू पेत्रास म्हणाला, ‘‘सैतानाने तुम्हा सर्वांचा नाश करायचे ठरविले आहे, परंतू मी तुम्हासाठी प्रार्थना केली आहे, पेत्रा, अशासाठी की तुमचा विश्वास डळमळू नये.‌‌‌तरीदेखिल आज रात्री, कोबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-10.jpg)
‌‌‌तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, ‘‘मला मरावे जरी लागले, तरी मी तुला नाकारणार नाही!’’‌‌‌बाकीच्या शिष्यांनीही तसेच म्हटले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-11.jpg)
‌‌‌मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन गेथशेमाने म्हटलेल्या ठिकाणी गेला.‌‌‌शिष्यांनी परिक्षेत पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले.‌‌‌मग येशू स्वत: प्रार्थना करावयास गेला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-12.jpg)
‌‌‌येशूने तीन वेळा प्रार्थना केली ,‘‘हे पित्या, जर शक्य असेल, तर हा दु:खसहनाचा प्याला माझ्यापासून दूर कर.‌‌‌परंतु लोकांच्या पापक्षमेसाठी दुसरा मार्गच नसेल, तर तुझी इच्छा पूर्ण होवो.’’‌‌‌‌‌‌येशू खूप व्याकूळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा झाला.‌‌‌देवाने एक देवदूत पाठवून त्यास सामर्थ्य दिले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-13.jpg)
प्रार्थना संपवून प्रत्येक वेळी येशू शिष्यांकडे आलेला असता शिष्य झोपलेल्या अवस्थेत त्याला आढळले.‌‌‌जेंव्हा तो तिस-यांदा परतला तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘उठा!’’‌‌‌माझा विश्वासघात करणारे आला आहे.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-14.jpg)
‌‌‌यहूदा धार्मिक पुढारी, सैनिक व एका मोठया लोकसमुदायाबरोबर आला.‌‌‌त्यांनी आपणाबरोबर तलवारी व सोटे आणले होते.‌‌‌यहूदा येशूजवळ येऊन म्हणाला, ‘‘सलाम, गुरुजी, आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.‌‌‌कोणाला पकडावे हे यहूदी धर्मपुढा-यांना समजण्यासाठे हे एक चिन्ह होते.‌‌‌तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘यहूदा, माझे चुंबन घेऊन माझा विश्वासघात करीत आहेस काय?
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-38-15.jpg)
‌‌‌सैनिक येशूला पकडत असतांना, पेत्राने आपली तलवार काढली व महायाजकाच्या सेवकाचा कान कापला.‌‌‌येशू म्हणाला,‘‘तलवार बाजुला ठेव!‌‌‌मी पित्यास माझ्या बचावासाठी देवदूतांचे सैन्य मागू शकतो.‌‌‌परंतू मला पित्याची आज्ञा पाळणे आवश्यक आहे”.‌‌‌मग येशूने त्या मनुष्याचा कान बरा केला.‌‌‌येशूला अटक झाल्यानंतर, सर्व शिष्य पळून गेले.
_बायबल कथा:‌‌‌मत्तय 26:14-56; मार्क 14 : 10-50; लूक 22 : 1-53; योहान 12:6; 18:1 - 11_