mr_obs/content/35.md

8.0 KiB
Raw Permalink Blame History

‌‌‌दयाळू पित्याची गोष्ट

OBS Image

‌‌‌एके दिवशी, त्याचे ऐकण्यास जमलेल्या अनेक जकातदार व पापी लोकांस येशू शिकवीत होता.

OBS Image

‌‌‌काही धार्मिक पुढारीही त्या ठिकाणी होते व येशू पापी लोक व जकातदार यांना मित्राप्रमाणे वागवतो हे त्यांनी पाहिले आणि ते त्याच्यावर आपसात टीका करु लागले.‌‌‌तेंव्हा येशून त्यांना ही गोष्ट सांगितली.

OBS Image

‌‌‌‘‘एका मनुष्यास दोन पुत्र होते.‌‌‌धाकटया पुत्राने त्याकडे जाऊन म्हटले, ‘‘बापा, माझ्या वाट्याला येणारी मालमत्ता मला आत्ता द्या’’‌‌‌यास्तव पित्याने आपल्या संपत्तीचे दोन वाटे दोन मुलांसाठी केले.

OBS Image

‌‌‌‘‘लवकरच धाकटा मुलगा सर्व मालमत्ता घेऊन दूरदेशी निघून गेला आणि तेथे वाईट मार्गानी ती संपवून टाकली.

OBS Image

‌‌‌‘‘त्यानंतर, तो राहात असलेल्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास अन्न खरेदी करण्यास त्याच्याजवळ पैसे उरले नाहीत.‌‌‌तेंव्हा त्याला केवळ एकच काम मिळाले ते होते शेतामध्ये डुकरे चारण्याचे काम.‌‌‌तो एवढा दीनवाणा व भूकेलेला होता की डुकरे खात असलेल्या शेंगा खाऊ की काय असे त्याला वाटले.

OBS Image

‌‌‌‘‘शेवटी, तो धाकटा पुत्र स्वत:ला म्हणाला, ‘‘मी येथे काय करतोय?’’‌‌‌माझ्या पित्याच्या घरामध्ये नोकरचाकारांची खाण्याची चंगळ आहे, आणि मी येथे उपाशी मरतोय.‌‌‌मी आपल्या पित्याकडे परत जाईल आणि त्याचा एक चाकर म्हणून राहण्यास विनंती करील.

OBS Image

‌‌‌‘‘अशा प्रकारे तो धाकटा पुत्र आपल्या पित्याच्या घराकडे जाण्यास निघाला.‌‌‌तो दूर असतानाच, पित्याने त्यास पाहिले व त्याला त्याची दया आली.‌‌‌त्याने धावत जाऊन त्यास मिठी मारली व त्याचे मुके घेतले.

OBS Image

‌‌‌‘‘पुत्र म्हणाला, ‘‘हे बापा, मी देवाविरुध्द व आपणाविरुध्द पाप केले आहे.‌‌‌मी आपला पुत्र म्हणविण्यास लायक नाही.

OBS Image

‌‌‌‘‘परंतू त्याच्या पित्याने एका चाकरास बोलावून म्हटले, ‘लवकर जा आणि माझ्या पुत्रास उत्तम वस्त्रे आण आणि त्याच्या अंगावर घाला!‌‌‌त्याच्या हातामध्ये अंगठी व पायामध्ये जोडे घाला.‌‌‌मग एक पुष्ट वासरु मारुन एक मेजवानी तयार करा व आपण सगळे आनंद साजरा करु, कारण माझा हा मुलगा मेला होता, पण आता जिवंत झाला आहे!‌‌‌तो हरवला होता, पण आता सापडला आहे!

OBS Image

‌‌‌‘‘अशाप्रकारे त्यांनी आनंदोत्सव सुरु केला.‌‌‌त्याअगोदर, थोरला मुलगा शेतामध्ये काम करुन घरी आला होता.‌‌‌संगीत व नृत्याचा आवाज ऐकून त्याला आश्चर्य वाटले.”

OBS Image

‌‌‌‘‘जेंव्हा थोरल्या पुत्रास कळले की त्याचा घाकटा भाऊ घरी आला आहे, तेंव्हा तो रागावला व आत जाईना.‌‌त्याचा पिता बाहेर येऊन त्यास आत येण्यासाठी व आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करु लागला, परंतू त्याने आत जाण्यास नकार दिला.

OBS Image

‌‌‌”थोरला पुत्र आपल्या पित्यास म्हणाला, ‘एवढी वर्षे मी तुम्हासाठी विश्वासूपणे काम करत आहे!‌‌‌मी तुमच्या आज्ञेच्या पलिकडे काहीही केले नाही, तरिही तुम्ही माझ्या मित्रांसोबत आनंद करण्यासाठी एक लहानसे करडूही दिले नाही.‌‌‌परंतू तुमचा हा पुत्र आपली सारी मालमत्ता वाईट मार्गाने नष्ट करुन घरी परतल्यावर, आपण त्याच्यासाठी एक उत्तम वासरु कापले आहे!

OBS Image

‌‌‌“पित्याने उत्तर दिले, ‘माझ्या मुला, तू नेहमीच माझ्या सोबत आहेस, आणि माझे जे काही आहे, हे सर्व तुझेच आहे.‌‌‌परंतू आता आपण आनंद करणे योग्य आहे, कारण तुझा हा भाऊ मेला होता, पण आता जिवंत झाला आहे.‌‌‌तो हरवला होता, पण आता सापडला आहे!

बायबल कथा:‌‌‌लूक 15:11 - 32