mr_obs/content/28.md

5.5 KiB
Raw Permalink Blame History

‌‌‌एक श्रीमंत तरुण अधिकारी

OBS Image

‌‌‌एके दिवशी, एक श्रीमंत तरुण अधिकारी येशूकडे येऊन विचारु लागला,‘‘उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे?’’‌‌‌येशून त्यास म्हटले,‘‘तू मला ‘उत्तम’ असे का म्हणतोस?‌‌‌एका देवा शिवाय कुणीच उत्तम नाही.‌‌‌परंतु तुला सार्वकालिक जीवन हवे आहे, तर देवाच्या आज्ञा पाळ.

OBS Image

‌‌‌‘‘कोणत्या आज्ञा मी पाळावयाची आवश्यकता आहे? त्याने विचारले.‌‌‌येशूने उत्तर दिले,‘‘खून करु नकोस.‌‌‌व्यभिचार करु नकोस.‌‌‌चोरी करु नकोस.‌‌‌खोटे बोलू नकोस.‌‌‌आपल्या आईबापाचा मान राख, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर.

OBS Image

‌‌‌परंतु त्या तरुणाने म्हटले,‘‘हया सर्व आज्ञा मी लहानपणापासूनच पाळत आलो आहे.‌‌‌सर्वकाळ जगण्यासाठी मला आणखी काय करण्याची गरज आहे?’’‌‌‌येशूने त्याच्याकडे पाहिले व त्याच्यावर प्रीती केली.

OBS Image

‌‌‌येशूने उत्तर दिले,‘‘जर तू पूर्ण होऊ पाहतोस, तर जा आणि तूझी सर्व मालमत्ता विकून आलेला पैसा गोरगरीबांस दे, म्हणजे तुला स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल.‌‌‌मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.

OBS Image

‌‌‌येशूचे हे बोलणे ऐकून तो तरुण खूप निराश झाला, कारण तो खूप श्रीमंत होता व आपल्या जवळची मालमत्ता दुस-यास देऊ इच्छीत नव्हता.‌‌‌तो येशूपासून निघून गेला.

OBS Image

‌‌‌मग येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात जाणे फार कठिण आहे!‌‌‌होय, श्रीमंताचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा ऊंटाला सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे.

OBS Image

‌‌‌जेंव्हा शिष्यांनी हे ऐकले तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला व ते म्हणाले, ‘‘तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?

OBS Image

‌‌‌येशूने शिष्यांकडे पाहून म्हटले, ‘‘मनुष्यांस हे अशक्य आहे, परंतु देवाला सर्व काही शक्य आहे.

OBS Image

‌‌‌पेत्र येशूला म्हणाला, ‘‘आम्ही सर्व सोडून तुझ्या पाठीमागे आलो आहोत.‌‌‌याचे आम्हास काय प्रतिफळ मिळणार?

OBS Image

‌‌‌येशूने उत्तर दिले,‘‘ज्यांनी माझ्यासाठी घरे, भाऊ, बहिणी, माता, पिता, लेकरे किंवा मालमत्ता सोडली आहे, त्यांना ती 100 पटीने जास्त मिळणार व त्याजबरोबर अनंत काळचे स्वर्गीय जीवन हे वतन मिळेल.’’‌‌‌परंतु पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळांचे होईल’’

‌‌‌बायबल कथा:‌‌‌मत्तय 19:16 - 30; मार्क 10: 17 - 31; लूक 18:18 - 30