mr_obs/content/20.md

55 lines
10 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains invisible Unicode characters

This file contains invisible Unicode characters that are indistinguishable to humans but may be processed differently by a computer. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# ‌‌‌पाडाव आणि सुटका
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-01.jpg)
‌‌‌इस्त्रायलाचे राज्य व यहूदाचे राज्य या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले.‌‌‌देवाने त्यांच्याशी सिनाय पर्वतावर केलेला करार त्यांनी तोडला.‌‌‌देवाने त्यांनी पश्चाताप करावा व देवाकडे वळावे म्हणून भविष्यवक्ते पाठविले, परंतु त्यांनी आज्ञा मानण्याचे त्यांनी नाकारले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-02.jpg)
‌‌‌म्हणून देवाने त्या दोन्ही राज्यांना शिक्षा दिली, त्यांच्या शत्रूंना त्यांचा नाश करु दिला.‌‌‌अश्शूर हया दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्त्रायलाचा नाश केला.‌‌‌अश्शूरी लोकांनी इस्त्रायलाच्या अनेक लोकांस जीवे मारिले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली व देशाचा बराच भाग जाळून टाकला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-03.jpg)
‌‌‌अश्शूरी लोकांनी सर्व नेत्यांस, श्रीमंतांस व कुशल कारागिरांस एकत्र करुन आपल्या देशामध्ये नेले.‌‌‌केवळ फार गरीब इस्त्रायल लोक जे युद्धमध्ये मारले गेले नाहीत, तेच इस्त्रायलमध्ये शिल्लक राहिले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-04.jpg)
‌‌‌तेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले.‌‌‌परराष्ट्रीयांनी नाश झालेल्या शहरांची पुनर्बांधणी केली व इस्त्रायली स्त्रीयांशी विवाह केला इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-05.jpg)
‌‌‌यहूदा राज्यातील लोकांनी पाहिले की, इस्त्रायल राज्यातील लोकांना अविश्वास व आज्ञा मोडल्यामुळे देवाने कशाप्रकारे शासन केले आहे.‌‌‌पण तरीही त्यांनी मूर्तिपूजा केली व कनानी दैवतांचीही उपासना केली.‌‌‌देवाने इशारा देण्यासाठी त्यांच्याकडे संदेष्टये पाठविले, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-06.jpg)
‌‌‌सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबूखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले.‌‌‌बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते.‌‌‌यहूदाचा राजा नबुखद्नेस्सराचा सेवक बनण्यास तयार झाला व प्रतिवर्षी मोठया प्रमाणात पैसे देण्यासही तयार झाला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-07.jpg)
‌‌‌परंतु काही वर्षांनंतर यहूदाच्या राजाने बाबेल विरुध्द बंड पुकारले.‌‌‌म्हणून बाबेलच्या लोकांनी परत येऊन यहूदाच्या राज्यावर चढाई केली.‌‌‌त्यांनी यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला व शहरातील व मंदिरातील सर्व संपती घेऊन गेले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-08.jpg)
‌‌‌यहूदाच्या राजाच्या हया बंडखोरपणाबद्दल शासन म्हणून नबुखद्नेस्सरच्या सैनिकांनी यहूदाच्या राजाच्या मुलांचा त्याच्या समोर वध केला व यहूदाच्या राजाचे डोळे फोडून त्यास आंधळे केले.‌‌‌त्यानंतर त्यांनी त्यास मरण्यासाठी बाबेल येथील तुरुंगात ठेवले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-09.jpg)
‌‌‌नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले.‌‌‌हयाच कालावधित जेंव्हा देवाच्या लोकांस वचनदत्त देश सोडून जाण्यास सक्ति करण्यात आली, त्यास पाडाव- हद्दपारी असे म्हणतात.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-10.jpg)
‌‌‌जरी देवाने आपल्या लोकांचा त्यांच्या पापांमुळे त्यांचा पाडाव होऊ दिला तरीही तो त्यांना व त्याने दिलेले वचन विसरला नाही.‌‌‌देवाची आपल्या लोकांवर कृपादृष्टी होती व संदेष्टयांच्या द्वारे तो त्यांच्याशी बोलत असे.‌‌‌त्याने त्यांना आश्वासन दिले की, सत्तर वर्षांनंतर तो त्यांना परत वचनदत्त देशात घेऊन येईल.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-11.jpg)
‌‌‌त्यानंतर सुमारे सत्तर वर्षांनी पारसाचा राजा कोरेश हयाने बाबेलचा पराभव केला व बाबेलच्या राज्याच्या जागी पारसाचे राज्य आले.‌‌‌इस्त्रायली लोक आता यहूदी या नावाने ओळखले जाऊ लागले व त्यांच्यापैकी पुष्कळ लोक आपल्या आयुष्यभर बाबेलमध्येच राहिले.‌‌‌केवळ थोडयाशा वयोवृध्द यहूद्यांनाच यहूदी राज्याचे स्मरण होते.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-12.jpg)
‌‌‌पारसाचे साम्राज्य शक्तिशाली होते, परंतु आपण पराभूत केलेल्या लोकांविषयी ते दयाळू होते.‌‌‌कोरेश पारसाचा राजा झाल्यानंतर लगेच त्याने फर्मान काढले की जर कोणी यहूदी यहूदामध्ये परत जाऊ इछितो तर त्याला तसे करण्याची परवानगी आहे.‌‌‌त्याने त्यांना मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी पैसाही पुरविला.‌‌‌अशा प्रकारे सत्तर वर्षाचा हद्दपारी संपवून यहूद्यांचा छोटा समूह यहूदातील यरुशलेमेस परतला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-20-13.jpg)
‌‌‌यरुशलेमेस आल्यानंतर त्यांनी मंदिराचे पुनर्वसन केले व शहराच्या वेशी पुन्हा बांधल्या.‌‌‌जरी अद्याप त्यांच्यावर अन्य लोकांचे वर्चस्व होते, तरी आता पुन्हा एकदा वचनदत्त देशामध्ये ते राहू लागले व मंदिरामध्ये देवाची उपासना करु लागले.
_बायबल कथा: राजे 17; 24-25 ; 2 इतिहास 36; एज्रा 1 - 10; नहेम्या 1 : 13_