mr_obs/content/19.md

75 lines
14 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains invisible Unicode characters

This file contains invisible Unicode characters that are indistinguishable to humans but may be processed differently by a computer. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# ‌‌‌संदेष्ट्ये =====
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-01.jpg)
‌‌‌इस्त्रायलाच्या संपूर्ण इतिहासामध्ये, देवाने त्यांच्याकडे संदेष्ट्ये पाठविली.‌‌‌संदेष्ट्ये देवाकडून संदेश ऐकत व तो लोकांपर्यंत पोहचवित असत.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-02.jpg)
‌‌‌जेंव्हा अहाब इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता.‌‌‌अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.‌‌‌एलीया अहाबास म्हणला,‘‘जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्त्रायलमध्ये पाऊस पडणार नाही.’’‌‌‌हे ऐकून अहाबाला खूप राग आला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-03.jpg)
‌‌‌अहाब एलीयास जीवे मारु इचछीत होता म्हणून देवाने एलीयास जंगलातील एका ओहोळाजवळ लपून राहाण्यास सांगितले.‌‌‌प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी, पक्ष्यांच्या द्वारे देवाने त्यास भोजन पुरविले.‌‌‌अहाब व त्याचे सैन्य एलीयास शोधत होते, पण त्यांना तो सापडला नाही.‌‌‌दुष्काळ एवढा भयानक होता की शेवटी तो ओहोळही आटला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-04.jpg)
‌‌‌म्हणून एलीया शेजारच्या देशामध्ये गेला.‌‌‌त्या देशात राहणारी एक विधवा व तिचा मुलगा यांच्याकडे असणारी अन्नसामग्री दुष्काळामुळे संपत आली होती.‌‌‌परंतु त्यांनी एलीयाची काळजी घेतली, म्हणून देवाने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुप्पीतील तेल कधीच संपले नाही.‌‌‌संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत त्यांच्याकडे अन्न उपलब्ध होते.‌‌‌एलीया त्या ठिकाणी पुष्कळ वर्षे राहिला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-05.jpg)
‌‌‌साडेतीन वर्षानंतर देवाने एलीयास इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करावयास सांगितली.‌‌‌जेव्हा अहाबाने एलियास पाहिले तेंव्हा तो म्हणाला, तूच तो छळणारा ना!” ‌‌‌एलियाने त्यास उत्तर दिले,‘‘तूच छळणारा आहेस !‌‌‌तू आपला खरा देव याव्हे यास सोडून बालदेवतेची पूजा केली आहेस.‌‌इस्त्रायल राज्याच्या सर्व लोकांना कर्मेल डोंगरावर घेऊन ये.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-06.jpg)
‌‌‌तेंव्हा इस्त्रायलाच्या राज्यातील सर्व लोक, बालदेवतेच्या 450 संदेष्टयांसहित कर्मेल डोंगराकडे आले.‌‌‌एलीया लोकांस म्हणाला,‘‘तुम्ही किती वेळ आपले मन बदलत राहणार ?‌‌‌जर याव्हे हा खरा देव असेल तर त्याचीच सेवा करा!‌‌‌जर बाल देव असेल, तर त्याची सेवा करा!”
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-07.jpg)
‌‌‌मग एलीया बालदेवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका.‌‌‌मीही तसेच करीन.‌‌‌जो देव अग्निच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.’’‌‌‌अशा प्रकारे बालदेवतेच्या याजकांनी होमार्पण तयार केले पण त्यास आग लावली नाही.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-08.jpg)
‌‌‌मग बालदेवतेचे संदेष्टये प्रार्थना करु लागले,‘‘बालदेवता, आमचे ऐका!’’‌‌‌ते दिवसभर प्रार्थना करत व ओरडत होते, त्यांनी स्वत:ला चाकूने कापलेही तरीही त्यांना उत्तर मिळाले नाही.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-09.jpg)
‌‌‌शेवटी संध्याकाळच्या वेळी एलियाने देवासाठी होमार्पण तयार केले.‌‌‌मग त्याने लोकांस बारा घागरी(पाणी भरण्याचे मोठे भांडे) पाणी त्या होमबलीवर व इंधनावर ओतण्यास सांगितले. इतके की होमबली व इंधन व वेदी भोवतालची जमीन सुद्धा पूर्णपणे भिजली.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-10.jpg)
‌‌‌मग एलीयाने प्रार्थना केली,‘‘हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या देवा, इस्त्रायलामध्ये तूच देव आहेस व मी तुझा सेवक आहे हे सर्वांस दाखव.‌‌‌मला उत्तर दे म्हणजे तूच खरा देव आहेस अशी या लोकांना खात्री पटेल.”
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-11.jpg)
‌‌‌तेंव्हा परमेश्वरापासून अग्नि उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती आणि त्या खळग्यातले पाणी सुद्धा भस्म करुन टाकले.‌‌‌हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर (याव्हे) हाच देव !‌‌‌परमेश्वर हाच देव!
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-12.jpg)
‌‌‌तेंव्हा एलीया त्यांस म्हणाला,‘‘बआलाच्या संदेष्टयांस पकडा; त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका !’’‌‌‌तेंव्हा त्यांनी त्यांस पकडिले; आणि त्यास दूर नेऊन त्यांस जीवे मारिले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-13.jpg)
‌‌‌मग एलीया अहाब राजास म्हणाला,‘‘लवकर नगरास जा कारण पाऊस येत आहे.’’‌‌‌लगेच आकाशामध्ये काळे ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडू लागला.‌‌‌याव्हे देवाने अशाप्रकारे दुष्काळ संपवला आणि आपणच खरा देव आहे हे सिद्ध केले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-14.jpg)
‌‌‌एलीया नंतर देवाने अलीशा नावाच्या मनुष्यास आपला संदेष्टा म्हणुन नेमले.‌‌‌देवाने अलीशाद्वारे अनेक चमत्कार केले.‌‌‌एक चमत्कार शत्रुचा सेनापती नामान, याच्यासाठी झाला, त्याला एक भयंकर चर्मरोग होता.‌‌‌त्याने अलीशाविषयी ऐकले होते म्हणून तो त्याच्याकडे गेला व आपणास बरे करा अशी विनंती केली.‌‌‌अलीशाने नामानास यार्देन नदीमध्ये सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-15.jpg)
‌‌‌सुरुवातीस नामानास राग आला व असे करण्यास तो तयार झाला नाही, कारण ते त्याला मूर्खपणाचे वाटले.‌‌‌परंतु नंतर त्याने आपले मन बदलले व त्याने यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारली.‌‌‌जेंव्हा सातव्या वेळी त्याने डुबकी मारली तेंव्हा त्याचे कोड पूर्णपणे बरे झाले!‌‌‌देवाने त्याला बरे केले होते.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-16.jpg)
‌‌‌देवाने अन्य संदेष्टयेही पाठविले.‌‌‌त्या सर्वांनी लोकांना मूर्तीपूजा बंद करा आणि दुस-यांना न्याय व दया दाखवा असे सांगितले.‌‌‌संदेष्टयांनी त्यांना इशारा दिला की जर त्यांनी आपला वाईट मार्ग सोडून देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर देव त्यांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा करील.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-17.jpg)
‌‌‌पुष्कळ वेळा लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.‌‌‌त्यांनी वारंवार संदेष्टयांचा अपमान केला व कधी कधी त्यांस जीवे मारिले.‌‌‌एकदा त्यांनी यिर्मया संदेष्टयास मरण्यानाठी कोरड्या विहिरीमध्ये ढकलून दिले.‌‌‌विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळामध्ये तो रुतला, परंतु नंतर राजाला त्याची दया आली व तो मरण्यापुर्वी त्याला बाहेर काढण्याची त्याने त्याच्या सेवकांना आज्ञा दिली.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-19-18.jpg)
‌‌‌जरी लोक त्यांचा द्वेष करत होते, तरी संदेष्टे देवासाठी बोलत राहिले. ‌‌‌त्यांनी लोकांस सावधानतेचा इशारा दिला की जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर देव त्यांचा नाश करील.‌‌‌देवाच्या अभिवचना प्रमाने मशीहा (ख्रिस्त) येणार आहे याचीही त्यांनी लोकांना आठवण करुन दिली.
_बायबल कथा :1 राजे 16 - 18; 2 राजे 5 ; यिर्मया 38_