mr_obs/content/12.md

9.0 KiB

निर्गमन

OBS Image

मिसर देश सोडत असतांना इस्राएल लोकांना खूप आनंद झाला.आता ते गुलाम नव्हते, ते आता वचनदत्त भूमीकडे वाटचाल करत होते!मिसरातील लोकांनी इस्राएल लोकांनी मागितलेल्या सर्व वस्तु अर्थात सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तू त्यांना दिल्या.काही परराष्ट्रीय लोकांनीही देवावर विश्वास ठेवला व इस्राएल जनतेबरोबर त्यांनीही मिसर देश सोडला.

OBS Image

देवाने एका ऊंच ढगाच्या खांबाद्वारे जो दिवसा त्यांच्या पुढे चालत असे व रात्री तोच ऊंच अग्निचा खांब बनत असे त्याद्वारे त्यांचे मार्गदर्शन केले.देव नेहमी त्यांच्याबरोबर होता व प्रवासात त्यांचे मार्गदर्शन करत होता.त्यांना एकच गोष्ट करायची होती ती म्हणजे देवाचे आज्ञापालन करणे.

OBS Image

थोड्या वेळाने इकडे फारोचे व त्याच्या लोकांचे मन बदलले व इस्राएलांना पुन्हा त्यांचे गुलाम करावे असे त्यांना वाटले.परमेश्वराने फारोला हट्टी व कठोर बनविले, अशासाठी की लोकांना ख-या व जीवंत देवाची ओळख पटावी व यहोवा देव हा फारो व त्याच्या देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे हे त्यांना समजावे.

OBS Image

मग फारो व त्याचे सैन्य इस्राएल लोकांना पुन्हा त्यांचे गुलाम बनविण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागले.जेव्हा इस्राएलांनी मिसरी सैन्य त्यांचा पाठलाग करतांना पाहिले तेव्हा त्यांना समजले की ते आता मिसरी सैन्य आणि तांबड्या समुद्राच्या मध्ये अडकले आहेत.ते फार घाबरले व ओरडले, "आम्ही मिसर देश का सोडला?आता आम्ही मरणार !"

OBS Image

मोशेने इस्राएलास सांगितले, "भिऊ नका! देव तुमच्या वतीने आज लढणार आहे व तुमचे तारण करणार आहे.”मग देव मोशेस म्हणाला, "लोकांना तांबड्या समुद्राकडे जाण्यास सांग."

OBS Image

मग देवाने इस्राएली लोक व मिसरी सैन्य यांच्या मधोमध मेघस्तंभ (ढगाचा खांब) उभा केला व यामुळे मिसरी सैन्य इस्राएलास पाहू शकत नव्हते.

OBS Image

देवाने मोशेला तांबड्या समुद्रावर आपली काठी उभारण्यास व तो समुद्र दुभागण्यास सांगितले.मग देवाने जोरदार वा-याच्या साह्याने समुद्राचे पाणी डावीकडे व उजवीकडे हटवले,व समुद्रात कोरडी वाट तयार केली.

OBS Image

इस्राएली लोक भरसमुद्रात कोरड्या भूमिवरून चालत गेली व त्यांच्या दोन्ही बाजूंनी पाणी भिंतीसारखे झाले.

OBS Image

मग देवाने मेघस्तंभ वरती घेऊन मार्गातून हलवला यासाठी की इस्राएली लोक आपल्या हातातून निसटून जात आहेत हे मिसरी लोकांना दिसावे.मिसरी लोकांनी त्यांचा पाठलाग करावयाचे ठरवले.

OBS Image

व ते इस्राएलांचा पाठलाग करत समुद्रातील वाटेने आत आले, परंतु देवाने त्यांना भिती घातली व त्यांचे रथही चिखलामध्ये अडकून बसले.ते ओरडले, "पळा!"कारण देव इस्राएलांच्या वतीने लढत आहे!"

OBS Image

जेव्हा सर्व इस्राएल लोक सुरक्षितपणे समुद्राच्या दुस-या बाजुला पोहोचले, देवाने मोशेला आपला हात उंच करावयास सांगितले.त्याने असे केल्यानंतर, समुद्राचे पाणी मिसरी सैन्यावर पडू लागले व पूर्वीसारखे झाले.सर्व मिसरी सैन्य पाण्यात बुडून मेले.

OBS Image

जेव्हा इस्राएलांनी पाहिले की मिसरी सैन्य मेले, तेव्हा त्यांनी देवावर व मोशे हा देवाचा संदेष्टा आहे याजवर विश्वास ठेवला.

OBS Image

इस्राएल लोकांनी मोठा आनंद केला, कारण देवाने त्यांचे मरण व गुलामगिरीपासून तारण केले होते! आता ते आपल्या देवाची सेवा करण्यासाठी स्वतंत्र झाले होते.इस्राएल लोकांनी त्यांना नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल पुष्कळ गीते गाऊन आनंद केला व देवाची स्तुती केली, कारण देवाने त्यांना मिसरी सैन्यांपासून तारले होते.

OBS Image

देवाने इस्राएलाला मिसरी लोकांवर कसा विजय दिला व त्यांची गुलामगिरीपासून कशी सुटका केली याचे स्मरण त्यांना राहावे म्हणून देवाने इस्राएलास दरवर्षी वल्हांडण सण साजरा करण्याची आज्ञा दिली.निष्कलंक कोक-याचे बलिदान देऊन त्याचे मांस बेखमीर भाकरीबरोबर खाऊन त्यांनी हा सण साजरा केला.

बायबल कथाःनिर्गम 12:33-15:21