mr_obs/content/09.md

9.2 KiB

देव मोशेला पाचारण करतो

OBS Image

योसेफ मृत्यु पावल्यानंतर, त्याचे सर्व नातेवाईक मिसर देशात राहत होते.ते आणि त्यांची संताने अनेक वर्षे तेथे राहिली व त्यांस पुष्कळ मुले झाली.त्यांना इस्राएली असे म्हणत असे.

OBS Image

शेकडो वर्षांनंतर इस्राएली लोकांची संख्या खूप वाढली.योसेफाने केलेल्या कामगिरीचा मिसरी लोकांना विसर पडला.त्यांना आता इस्राएली लोकांची भिती वाटू लागली. कारण ते पुष्कळ होते.म्हणून त्यावेळी मिसरावर राज्य करत असलेल्या फारोने इस्राएल लोकांस मिसरी लोकांचे गुलाम करून ठेवले.

OBS Image

मिस-यांनी इस्राएलांस अनेक इमारतींचे बांधकाम करण्यास व मोठमोठ्या शहरांचे निर्माण करण्यास सक्ती केली.अशा कष्टांच्या कामाने त्यांचे जीवन खूप त्रासदायक झाले, परंतु देवाने त्यांना आशीर्वादित केले व त्यांना आणखी मुले झाली.

OBS Image

फारोने पाहिले की इस्राएल लोकांना पुष्कळ मुले होत आहेत, म्हणून त्याने आदेश दिला की इस्राएलांच्या पुत्र संतानांस नाईल नदीमध्ये फेकून द्यावे.

OBS Image

एका इस्राएली स्त्रीने एका मुलास जन्म दिला.तिने व तिच्या पतीने आपल्या बाळास काही काळापर्यंत लपविण्याचा प्रयत्न केला.

OBS Image

जेंव्हा त्या बाळाचे आईवडिल त्यास लपवू शकले नाही, तेंव्हा त्यांनी त्या बाळास मृत्युपासून वाचविण्यासाठी त्याला एका तरंगणा-या टोपलीमध्ये ठेवून ती नाईल नदीच्या तीरावर लव्हाळ्यात ठेवली.त्या बाळाची थोरली बहिण त्याचे काय होईल ते पाहत होती.

OBS Image

फारोच्या मुलीने ती टोपली उघडून आत बघितले.जेंव्हा तिने त्या बाळास पाहिले, तेंव्हा तिने त्यास आपला पुत्र बनविले.तिने त्या बाळास दुध पाजण्यासाठी एका इस्राएली स्त्रीस बोलाविले, परंतु ती त्याची आई होती हे तिला ठाऊक नव्हते.जेंव्हा ते बाळ मोठे झाले व त्यास आपल्या आईच्या दुधाची आवश्यकता नव्हती, तेंव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे सोपवले, तिने त्याचे नाव मोशे ठेवले.

OBS Image

एके दिवशी, जेंव्हा मोशे मोठा झाला, तेंव्हा त्याने एका मिसरी मनुष्यास एका यहूदी गुलामास मारताना पाहिले.मोशेने आपल्या इस्राएली बांधवास वाचविण्याचा प्रयत्न केला.

OBS Image

आपणांस कोणी पाहत नाही हे बघून मोशेने त्या मिस-यास जीवे मारले व त्याचे शरीर पुरले.परंतु मोशेने केलेले हे कृत्य कोणीतरी पाहिले होते.

OBS Image

जेंव्हा फारोने मोशेने केलेल्या कृत्याविषयी ऐकले तेंव्हा त्याने त्यास मारण्याचा प्रयत्न केला. फारोच्या शिपायांपासून सुरक्षित राहाण्यासाठी मोशे मिसर देश सोडून जंगलामध्ये पळून गेला.

OBS Image

मोशे आता मिसर देशापासून दूर जंगलामध्ये मेंढरे चारू लागला.त्याने तिथेच एका स्त्रीशी विवाह केला व त्यास दोन पुत्र झाले.

OBS Image

एके दिवशी मेंढरे चारत असतांना, मोशेने एक झुडूप जळत असतांना पाहिले.परंतु ते झाड जळून भस्म झाले नाही असे त्यास दिसून आले.मग ते न्याहाळून पाहावयास तो त्या झुडूपाकडे गेला.तो त्या जळत असलेल्या झुडूपाजवळ जात असतांना, देवाचा आवाज त्याच्या कानी पडला, "मोशे, तू आपल्या पायातले जोडे काढ.कारण तू पवित्र भूमीवर उभा आहेस."

OBS Image

देव म्हणाला, "मी आपल्या लोकांचे दुःख पाहिले आहे.मी तुला फारोकडे माझ्या लोकांना मिसराच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी पाठविणार आहे.मी त्यांना कनान देश देणार आहे, जो मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची प्रतिज्ञा केली होती."

OBS Image

मोशे म्हणाला, "जर लोकांनी मला विचारले की तुला कोणी पाठविले आहे, तर मी त्यास काय सांगू?"देव म्हणाला, "मी आहे तो आहे.त्यांना सांग, ‘मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.’त्यांना हेही सांग की, मी त्यांच्या पूर्वजांचा अर्थात अब्राहाम, इसहाक व याकोबाचा देव आहे.हेच माझे सनातन नाव आहे."

OBS Image

मोशे फार भयभित झाला व फारोकडे जाण्यास नकार देऊ लागला कारण त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते, म्हणून देवाने मोशेचा भाऊ, अहरोन, ह्यास त्याच्या मदतीस पाठविले.देवाने मोशे व अहरोनास अगोदरच सांगून ठेवले की फारो हट्टीपणा करील.

बायबल कथाःनिर्गम 1-4