mr_obs/content/08.md

8.9 KiB

देव योसेफ व त्याच्या कुटुंबाचा बचाव करतो

OBS Image

ब-याच वर्षांनंतर याकोब वयोवृद्ध झाला असतांना, त्याने आपला आवडता पुत्र, योसेफ, यास मेंढरांचे राखण करत असलेल्या आपल्या जेष्ठ भावांकडे त्यांचे कसेकाय चालले आहे हे पाहाण्यास पाठविले.

OBS Image

आपला पिता याकोब याचे योसेफावर जास्त प्रेम असल्यामुळे व योसेफ आपल्या भावांवर राज्य करील असे स्वप्न त्याला पडल्यामूळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले.जेंव्हा योसेफ आपल्या भावांकडे आला, तेंव्हा त्यांनी त्यास काही गुलामांच्या व्यापा-यांस विकून टाकले.

OBS Image

योसेफाच्या भावांनी घरी परतण्यापूर्वी योसेफाचा झगा शेळीच्या रक्तामध्ये बुडवला.मग त्यांनी तो झगा आपल्या बापास दाखविला अशासाठी की हिंस्त्र पशूने योसेफाची हत्या केली आहे यावर त्याचा विश्वास बसावा.याकोबास फार दुःख झाले.

OBS Image

त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले.नाईल नदीच्या तीरावर वसलेला मिसर देश हा एक मोठा, व सामर्थ्यशाली देश होता.गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास एका श्रीमंत सरकारी अधिका-यास विकून टाकले.योसेफाने आपल्या स्वामीची चांगली सेवा केली, आणि देवाने योसेफास आशीर्वादित केले.

OBS Image

त्याच्या स्वामीच्या पत्नीने योसेफाबरोबर कुकर्म करण्याचा प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारे देवाच्या विरूद्ध पाप करण्यास योसेफाने नकार दिला.यावर तिने संतप्त होऊन योसेफावर खोटा आरोप केला व योसेफास पकडून तुरुंगामध्ये टाकण्यात आले.तुरुंगामध्ये देखिल, योसेफ देवाशी विश्वासू राहिला, आणि देवाने त्यास आशीर्वाद दिला.

OBS Image

दोन वर्षांनंतर, निष्पाप असूनही योसेफ तुरुंगातच होता.एके रात्री, फारोला, दोन चिंताजनक स्वप्ने पडली.त्याच्या सल्लागारांपैकी कोणीही त्याला स्वप्नांचा अर्थ सांगू शकला नाही.

OBS Image

देवाने योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फारोने योसेफास तुरूंगातून आपल्या घरी आणले.योसेफाने त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व म्हटले, "देव सात वर्षे पुष्कळ पिकपाणी देईल व त्यानंतर सात वर्षे दुष्काळ पडेल.

OBS Image

योसेफाची फारोवर एवढी छाप पडली की त्याने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले.

OBS Image

योसेफाने लोकांना सुकाळातील सात वर्षांमध्ये धान्याचा भरपूर साठा करून ठेवण्यास सांगितले.मग योसेफाने दुष्काळातील सात वर्षे लोकांना खाण्यासाठी पुरेसे होईल इतके धान्य विकले.

OBS Image

तो दुष्काळ फक्त मिसरातच नव्हे तर याकोब आणि त्याचे कुटुंबिय राहात असलेल्या कनान देशामध्येही भयंकर असा होता.

OBS Image

मग याकोब आपल्या मोठ्या मुलांस अन्न विकत घेण्यासाठी मिसरात पाठवतो.धान्य विकत घ्यायला आलेले भाऊ योसेफाच्या समोर उभे होते पण त्यांनी त्यास ओळखले नाही.परंतु योसेफाने त्यांना ओळखले.

OBS Image

ते बदलले आहेत की नाही याची परीक्षा पाहिल्यानंतर, योसेफ त्यांना म्हणाला, "मी तुमचा भाऊ योसेफ आहे!"भिऊ नका.तुम्ही मला गुलाम म्हणून विकून माझे वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याच वाईटाचा माझे चांगले करण्यासाठी उपयोग केला!या आणि मिसर देशामध्ये वस्ती करून राहा, म्हणजे मी तुम्हास व तुमच्या कुटुंबियांस धान्याचा पुरवठा करीन.

OBS Image

जेंव्हा योसेफाचे भाऊ घरी आले व त्यांनी आपल्या बापास, याकोबास, योसेफ अजून जीवंत आहे असे सांगितले, तेंव्हा याकोबास खूप आनंद झाला.

OBS Image

जरी याकोब आता वृद्ध झाला होता, तरीही तो आपल्या कुटुंबियांसह मिसरात आला व ते सर्व तेथे राहू लागले.याकोबाने आपल्या मरणापूर्वी, आपल्या सर्व मुलांस आशीर्वाद दिला.

OBS Image

देवाने अब्राहमाशी केलेल्या कराराचे अभिवचन इसहाकाकडे, मग याकोब आणि त्याच्या बारा पुत्रांकडे व त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले होते.या बारा पुत्रांची संतती ही इस्राएलाचे बारा वंश झाले.

बायबल कथाःउत्पत्ति 37-50