mr_obs/content/06.md

3.9 KiB

परमेश्वर इसहाकास मदत करतो

OBS Image

जेंव्हा अब्राहाम म्हातारा झाला होता, तेंव्हा त्याचा मुलगा, इसहाक तरूण पुरुष झाला होता.म्हणून अब्राहामाने आपल्या दासांपैकी एका दासाला त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला मुलगा इसहाक,याच्यासाठी वधू आणण्यास पाठविले.

OBS Image

खूप लांब प्रवास केल्यानंतर अब्राहमचे नातेवाईक राहात असलेल्या ठिकाणी, देवबाप त्या सेवकास रिबकाकडे घेऊन येतो.ती आब्राहमच्या भावाची नात होती.

OBS Image

रिबका आपल्या बापाचे घर सोडून त्या सेवकाबरोबर इसहाकाच्या घरी जाण्यास तयार झाली.ती आल्यानंतर लगेच इसहाकाने तिच्याशी विवाह केला.

OBS Image

ब-याच वर्षांनंतर, अब्राहाम मरण पावला व देवाने त्याला कराराच्या रुपाने दिलेली सर्व अभिवचने इसहाकाकडे सोपवण्यात आली.देवाने अब्राहामास असंख्य संतती देण्याचे अभिवचन दिले होते, परंतु इसहाकाची पत्नी रिबेकास मुलबाळ नव्हते.

OBS Image

इसहाकाने रिबेकासाठी प्रार्थना केली, व देवाच्या कृपेने ती गरोदर राहीली व तिच्या पोटात जुळी मुले होती.ही दोन मुले रिबकेच्या पोटामध्ये असतांनाच एकमेकांशी झगडू लागली, तेंव्हा तिने देवाला विचारले की असे का होत आहे.

OBS Image

देव रिबकेस म्हणाला, "तुझ्या पोटातील दोन मुलांद्वारे दोन राष्ट्रे होतील.ते एकमेकांशी झगडतील; आणि वडील धाकट्याची सेवा करील."

OBS Image

जेंव्हा रिबकेच्या मुलांचा जन्म झाला, तेंव्हा पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते, त्याचे नांव एसाव ठेवले.त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ एसावाची टाच पकडून बाहेर आला आणि त्याचे नाव याकोब ठेवण्यात आले.

बायबल कथाःउत्पत्ति 24:1-25:26