mr_obs/content/04.md

64 lines
6.0 KiB
Markdown

# देवाचा अब्राहामाशी करार
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-01.jpg?direct&)
महापुरानंतर अनेक वर्षांनी, जगामध्ये पुन्हा लोक वाढले, व सर्वांची एकच भाषा होती.
देवाने सांगितल्याप्रमाणे पृथ्वी व्यापून न टाकता, ते एकत्र जमले व त्यानी एक शहर बांधले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-02.jpg?direct&)
ते खूप गर्विष्ठ होत गेले, व देव काय बोलला याकडे लक्ष दिले नाही.
त्यांनी स्वर्गापर्यंत पोहोचेल असा एक उंच बुरुज सुद्धा बांधण्यास सुरुवात केली.देव बोलला अशा प्रकारे दुष्टाई करण्यासाठी ते एकत्र काम करतील, तर ते अजून अधिक दुष्ट कृत्ये करतील.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-03.jpg?direct&)
मग देवाने त्यांच्या भाषेमध्ये गोंधळ निर्माण केला व अनेक भाषा निर्माण केल्या व अशा प्रकारे त्यांना सर्व जगात पांगवले.
जे शहर त्यांनी बनवण्यास घेतले त्यास बाबेल, म्हणजे “गोंधळ” असे म्हटले आहे.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-04.jpg?direct&)
शेकडो वर्षानंतर, देव अब्राम नावाच्या मनुष्याबरोबर बोलला.
देव त्यास बोलला, “तू आपला देश व आपल्या नातेवाईकांस सोडून मी दाखविल त्या देशात जा.
मी तुला आशीर्वाद देईन व तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.मी तुझे नाव मोठे करीन.
तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन व तुला जे शाप देतील त्यांना मी शाप देईन.
तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादीत होतील.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-05.jpg?direct&)
अब्रामने देवाच्या आज्ञेचे पालन केले.
त्याने आपली पत्नी साराय, व सर्व नोकरचाकरासहीत मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन अब्राम देवाने दाखविलेल्या कनान देशात जायला निघाला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-06.jpg?direct&)
कनान देशात आल्यानंतर देव अब्रामास म्हणाला, “तु तुझ्या आजूबाजूला बघ. हा देश जो तू पाहातोस मी तुला व तुझ्या संतानांना वतन म्हणुन देईन.
मग आब्राम तेथे वस्ती करुन राहिला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-07.jpg?direct&)
एके दिवशी, अब्राम परात्पर देवाचा याजक मलकीसदेकास भेटतो.
मलकीसदेकाने आब्रामास आशीर्वाद दिला व म्हणाला. “आकाश आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव अब्रामाला आशीर्वाद देवो.”
मग अब्रामाने मलकीसदेकाला आपल्या सर्व गोष्टींचा दहावा भाग दिला.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-08.jpg?direct&)
पुष्कळवर्षे गेली, पण अब्राम व साराय यांना अद्याप मुलगा नव्हता.
देवाने अब्रामाला पुन्हा दर्शन देऊन म्हटले की त्याला पुत्र होईल व त्याची संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे होईल.
अब्रामाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला.देवावर ठेवलेल्या विश्वासामुळे देवाने अब्रामाला नितिमान ठरवले.
![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-04-09.jpg?direct&)
मग देव अब्रामाबरोबर करार करतो.
करार हा दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये केला जातो.
देव बोलला, “तुला तुझ्याच पोटचा पुत्र होईल.”
तुझ्या संतानाला मी कनान देश देईल.”
परंतु अद्याप अब्रामास पुत्र झाला नव्हता
_बायबल कथाःउत्पत्ति 11-15_