mr_obs/content/03.md

9.9 KiB

जल प्रलय (महापूर)

OBS Image

बऱ्याच वर्षानंतर, पृथ्वीवर खूप लोकवस्ती वाढली. लोक खूपच दुष्ट व हिंसाचारी होत गेले.ते एवढे वाईट झाले की देवाने ठरविले की त्यांचा जलप्रलयाने नाश करावा.

OBS Image

परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. पृथ्वीवरील दुष्ट लोकांमध्ये राहणारा हा एक न्यायी पुरुष होता. देव एक मोठा पूर पाठवणार होता त्या जल प्रलयाविषयी देवाने नोहाला सांगितलेत्याने नोहाला एक प्रचंड तारू (जहाज) बनविण्यास सांगितले.

OBS Image

देवाने नोहाला 140 मीटर लांब, 23मीटर रुंद, व 13.5 मीटर उंचीचे तारू तयार करण्यास सांगितले. त्याने नोहास त्यामध्ये तीन मजले, पुष्कळश्या खोल्या, छत, व खिडकी बनविण्यास सांगितले.त्या तारवामध्ये नोहा, त्याचे कुटुंब, आणि पृथ्वीवरील प्रत्येक जातीचे पशु प्रलय समयी सुरक्षित राहाणार होते.

OBS Image

नोहाने देवाची आज्ञा पाळली. त्याने आणि त्याच्या तिन्ही मुलांनी देवाने सांगितल्याप्रमाणे तारू बांधले. हे जहाज बनविण्यासाठी कित्येक वर्षे लागली, कारण ते खूप मोठे होते. नोहाने लोकांना प्रलयाविषयी सांगितले व देवाकडे वळण्यास सांगितले पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

OBS Image

देवाने नोहा व त्याच्या कुटुंबियांसाठी व प्राण्यांसाठी पुष्कळसे अन्नधान्य साठविण्यास सांगितले. जहाज तयार झाल्यानंतर देवाने नोहा, त्याची बायको, त्याची मुले व सुना यांना तारवामध्ये जाण्यास सांगितले ते एकूण आठ जण होते.

OBS Image

देवाने नोहाकडे प्रत्येक प्राण्याचे व पक्षाचे नर व मादी पाठविले, अशासाठी की त्यांनी तारवात जावे व प्रलयापासून त्यांस संरक्षण मिळावे देवाने प्रत्येक जातीच्या प्राण्याचे सात नर व सात मादी देखील पाठविले त्यांचा उपयोग अर्पण करण्यासाठी होणार होता. त्या सर्वांनी तारवात प्रवेश केल्यानंतर देवाने स्वतः तारवाचा दरवाजा बंद केला.

OBS Image

आणि मग पाऊस सुरु झाला. पाऊस, पाऊस आणि पाऊस. चाळीस दिवस व चाळीस रात्र सतत पाऊस पडला. पृथ्वीखालील पाण्याचे उगम सुदधा मोकळे झाले व त्यातून जोरात पाणी वाहू लागले. सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून टाकली. सर्व पर्वतही बुडाले

OBS Image

तारवातील लोक व प्राणी सोडून, तारवाच्या बाहेर जमिनीवर असलेले सर्व काही प्रलयामध्ये मरून गेले. तारु पाण्यावर तरंगत राहिले व आतील सर्वजण बुडण्यापासून सुरक्षित होते.

OBS Image

पाऊस थांबल्यानंतर, तारु पाच महिने पाण्यावर तरंगत होते, व त्या अवधित पाणी ओसरत राहिले. मग एके दिवशी तारु एका पर्वतावर टेकले, परंतु संपूर्ण जग अजूनही पाण्याखालीच होते. आणखी तीन महिन्यानंतर पर्वताचे माथे दिसू लागले.

OBS Image

त्यानंतर आणखी चाळीस दिवसांनी नोहाने एक कावळा पाणी सुकले की नाही हे पाहाण्यास बाहेर सोडला. तो कावळा सुकी जमीन मिळावी म्हणुन इकडेतिकडे फिरत राहिला पण त्याला कोरडी जमीन मिळाली नाही.

OBS Image

नंतर नोहाने एक कबूतर बाहेर सोडले. परंतु त्यालाही कोरडी जमीन न मिळाल्याने ते नोहाकडे परत आले. एका आठवड्याने त्याने पुन्हा एक कबुतर बाहेर सोडले व ते आपल्या चोचीत जैतुनाची फांदी घेऊन आले पाणी ओसरत होते, आणि वनस्पती वाढू लागल्या होत्या!

OBS Image

नोहाने आणखी एक आठवडा वाट पाहून त्या कबूतरास तिसऱ्यांदा पाठविलेयावेळी, त्याला विसावण्यास ठिकाण सापडले व ते माघारी आले नाही. पाणी सुकत चालले होते!

OBS Image

दोन महिन्यानंतर देव नोहास म्हणाला, “ तु व तुझे कुटुंब आता तारवाबाहेर येऊ शकता. तुम्हाला पुष्कळ मुलेमुली व नातवंडे होवोत व पृथ्वी भरून टाका.”मग नोहा व त्याचे कुटुंब तारवाबाहेर आले.

OBS Image

नोहा तारवाबाहेर आल्यानंतर,त्याने वेदी बांधली व अर्पणासाठी वापरल्या जाणा-या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातुन काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले. देव नोहाच्या होमार्पणाने संतुष्ट झाला व त्याला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला.

OBS Image

देव बोलला, “मी वचन देतो येथूने पुढे मानवाच्या दुष्टाईमुळे भूमीला कधीही शाप देणार नाही, व पाण्याने जगाचा नाश करणार नाही, कारण मानव बाळपणापासुन पापी असतात.”

OBS Image

मग देवाने पहिल्यांदा मेघधनुष्य बनवला व नोहा बरोबर करार केला. मेघधनुष्य जेंव्हा जेंव्हा आकाशात दिसते, तेंव्हा तेंव्हा देवाला मानवाबरोबर केलेल्या कराराची आठवण होते व त्याच्या लोकांनाही आठवण होते.

बायबल कथा : उत्पत्ति 6-8