mr_obs-tn/content/35/12.md

2.0 KiB

(येशू पूढे गोष्ट सांगतो.)

लहानसे करडू

पोसलेल्या वासरा पेक्षा एका लहान शेळीच्या करडूने कमी लोकांचे पोट भरते, आणि त्याची किंमतही फार नसते. मोठा भाऊ तक्रार करतो की त्याचे वडील त्याच्यापेक्षा जास्त चांगली वागणूक त्याच्या धाकट्या पापी मुलाला देतात.

‌‌‌परंतू तुमचा हा पुत्र

हा वाकप्रचार दाखवितो की मोठा मुलगा रागावला आहे. तो त्याच्या धाकटा भावाला नाकारतो आणि त्याच्या वडीलांनी या लहरी मुलाचे परत आल्यामुळे स्वागत केले म्हणुन नापसंती दर्शवितो. इतर भाषेत अप्रत्यक्षपणे या गोष्टी व्यक्त करण्यासाठी अनेक प्रकार असू शकतात.

मालमत्ता वाईट मार्गाने उधळुन

म्हणजे, तुम्ही त्याला दिलेल्या पैशाची उधळपट्टी, किंवा, “आपली संपत्ती खाऊन टाकली.” शक्य असल्यास, अशा शब्दांचा वापर करा ज्यातून भावाचा राग व्यक्त होईल.

एक उत्तम वासरु कापले

म्हणजे,”मेजवानीच्यावेळी खाण्यास उत्तम वासरु कापले आहे.”