mr_obs-tn/content/34/09.md

1.7 KiB

(येशू गोष्ट सांगत आहे.)

दूर उभा राहिला

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, “दूर अंतरावर उभा राहिला” किंवा “स्वतंत्र उभा राहीला.”

अगदी वर आकाशाकडे सुध्दा नाही पाहीले

शब्द “अगदी” हे दर्शवितो की लोक सहसा देवाला प्रार्थना करताना आकाशाकडे बघतात, पण त्या मनुष्याने तसे केले नाही कारण पापी असल्यामुळे तो लाजला.

त्याने आपल्या छातीवर मारुन घेत

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, कारण त्याच्या अती दु:खामुळे तो त्याच्या मुठी त्याच्या छातीवर मारुन घेत होता “किंवा, तो दु: खामुळे त्याच्या छातीवर मारुन घेत होता.” जर लोकांस हे समजण्यास अवघड वाटत असेल कारण ते त्यांच्या छातीवर वेगळ्या कारणांसाठी मारुन घेतात, तर तुम्ही हे असे अनुवाद करु शकता, “तो त्याची निराशा दाखवत होता.”