mr_obs-tn/content/29/01.md

1.8 KiB

एके दिवशी

हे वाक्यांश एखादी घटना पुर्वी घडून गेली आहे हे सांगते पण निश्चीत वेळ सांगत नाही. पुष्कळ भाषांमध्ये एखादी खरी गोष्ट सांगत असतांना अशीच सुरुवात करतात.

माझा भाऊ

हा शब्द कधी कधी भावाबरोबर इतर लोकांसाठीही वापरला जातो, पण त्यासाठी काहीतरी जवळचा संबंध असावा लागतो उदा. धर्म पार्श्वभुमी इ.

माझ्याविरुद्ध पाप केले असता

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “माझ्याविरुद्ध काही चूक केली तर.”

सात वेळा नाही तर साताच्या सत्तर वेळा!

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “तू फक्त सात वेळा क्षमा करु नये तर, साताच्या सत्तर वेळा क्षमा करावी.” येशू बरोबर संख्या सांगत नाही. तो म्हणत आहे की आपण लोकांना प्रत्येक वेळी क्षमा करावी.

ह्यावरुन, य़ेशूला म्हणायचे होते

म्हणजे, “जेव्हा येशू हे बोलला त्याचा अर्थ हा होता.”