mr_obs-tn/content/28/06.md

1.6 KiB

देवाच्या राज्यात प्रवेश

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “देवाच्या राज्याचे नागरिक होणे.”

उंट

उंट हे फार मोठे प्राणी असतात त्यांचा उपयोग बहुधा जड ओझी वाहून नेण्यास करतात. जर तुमच्या भाषेत उंट हा प्राणी ओळखीचा नसेल, तर “फार मोठा प्राणी” किंवा, “ओझे वाहणारा प्राणी” असे शब्द वापरु शकता. जर तुम्ही ह्याला पर्यांय म्हणून दुसऱ्या मोठ्या प्राण्याचे नाव वापराल तर येशू बोलत असलेल्या “बैल”, “गाढव” ह्यासारखे प्राणी लोकांना माहीत आहेत ह्याची खात्री करा.

सुईचे नाक

हे सुईच्या एका टोकाला असलेल्या लहान छिद्राचा उल्लेख करते. उंटासारखा मोठा प्राणी सुईच्या नाकातून जाणे ही अगदी अशक्य गोष्ट आहे ही कल्पना इथे समोर मांडण्याचा हेतू आहे.