mr_obs-tn/content/26/04.md

1.8 KiB

जे शब्द / जे वचन मी इतक्यात तुमच्यापुढे वाचले ते आता पूर्ण झाले आहे

ह्याचे दुसऱ्या प्रकारे भाषांतर करायचे झाल्यास असे होईल, “ही जी वचने मी वाचली ती तुम्ही ऐकत असता पूर्ण झाली आहेत” किंवा, “आज जी वचने मी तुमच्यासाठी वाचली ती तुम्ही ऐकत असता खरी झाली.”

आश्चर्य वाटले

“आश्चर्य” ह्या शब्दाचे असे भाषांतर करा की त्यामध्ये ते चकीत झाले, अवाक् झाले, गोंधळून गेले हे कसे शक्य आहे असे त्यांना वाटले हा अर्थ येईल.

हा योसेफाचा पुत्र ना ?

ह्याचे असे सुद्धा भाषांतर होऊ शकते, “हा माणूस तर योसेफाचा मुलगा आहे!” किंवा “सगळ्यांना माहीत आहे की हा केवळ योसेफाचा मुलगा आहे!” लोक त्याला विचारीत नाहीत की तू योसेफाचा मुलगा आहे की नाही. ते विचार करीत होते की तो मशीहा कस काय असु शकेल कारण त्यांनी विचार केला होता की तो एक सामान्य माणसाचा मुलगा आहे.