mr_obs-tn/content/26/01.md

2.1 KiB

सैतानाच्या मोहपरीक्षांवर विजयी होऊन, येशू परततो

ह्याचे तुम्ही दोन वाक्ये करुन किवा म्हणू शकता, “सैतानाला पाहिजे असलेल्या चुकीच्या गोष्टी येशूने केल्या नाही आणि अशाप्रकारे त्याचा पराभव केला. त्यानंतर, येशू परतला.” “विजय मिळविणे” ह्या शब्दाचे भाषांतर “विरोध करणे” किंवा, “स्वीकार न करणे” किंवा, “नाकारणे” असेही करता येऊ शकेल.

पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल, “पवित्र आत्म्याने त्याच्याद्वारे कार्य केले” किंवा, “आणि पवित्र आत्मा त्याला सामर्थ्याने मार्गदर्शन करीत होता.”

ठिकठिकाणी शिक्षण देत तो गेला

म्हणजे, त्याने “वेगवेगळ्या शहरी आणि इतर ठिकाणी प्रवास केला आणि तेथील लोकांना शिकवले.”

प्रत्येकजण

म्हणजे, “जे जे त्याला ओळखत होते किंवा ज्यांनी ज्यांनी त्याच्याविषयी ऐकले तो.”

त्याच्याविषयी चांगले बोलले

म्हणजे, “त्याच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलले.”