mr_obs-tn/content/25/05.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

देवाच्या वचनात, तो आपल्या लोकांना आज्ञा देतो, ‘तू आपल्या देवाची परीक्षा पाहू नकोस.

ह्याचे भाषांतर अप्रत्यक्ष कथनात करता येईलः “देव आपल्याला आज्ञा देतो की, आपण देवाची परीक्षा पाहू नये.”

तू आपला देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस

ह्याचे भाषांतर असे करता येईल, “तू आपल्या देव परमेश्वराला तुझ्यापुढे स्वतःला सिद्ध करायला लावू नकोस” किंवा, “तू आपला देव परमेश्वर, तो चांगला आहे हे सिद्ध करायला लावू नकोस.”

प्रभु तुझा देव

म्हणजे “परमेश्वर, तुझा देव” किंवा, “परमेश्वर, जो देव आहे आणि ज्याचा तुझ्यावर अधिकार आहे.”