mr_obs-tn/content/25/01.md

2.0 KiB

त्याला पवित्र आत्म्याने नेले

म्हणजे, “पवित्र आत्म्याने त्याला मार्गदर्शन दिले” किंवा, पवित्र आत्म्याने जाण्यास प्रेरीत केले.”

अरण्य

ह्याचे सुद्धा असे भाषांतर करता येईल, “वाळवंट” किंवा, “दुर्गम नापीक भाग जेथे फार थोडे लोक राहतात.” ह्या ठिकाणी कदचित फार थोडे झाडे किंवा वनस्पती असणार, म्हणून तेथे जास्त लोक राहू शकत नव्हते

चाळीस दिवस चाळीस रात्री

“चाळीस दिवसातले, दिवस म्हणजे, रात्रीच्या वेळी.” लक्षात ठेवा ह्या वाक्यांशाचे भाषांतर करतांना ऐंशी दिवसाचा कालावधी आहे असे वाटायला नको.

त्याला पाप करण्यासाठी मोहात/परीक्षेत पाडणे

येशूने पाप केले नाही त्यामुळे लक्षात ठेवा असा शब्द वापरा की ज्यामध्ये असा अर्थ निघणार नाही की सैतान येशूकडून पाप करुन घेण्यात यशस्वी झाला. ह्या वाक्याचे भाषांतर असेही करता येईल, “त्याला पाप करावेसे वाटावे असा प्रयत्न केला.”