mr_obs-tn/content/24/04.md

2.5 KiB

विषारी सापांनो

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल, “तुम्ही लबाड विषारी सापासारखे आहात!” योहान त्यांना विषारी साप म्हणतो कारण ते धोकादायक आणि फसवे होते.

प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही

योहान प्रत्यक्ष झाडाविषयी बोलत नाही. ही एक उपमा आहे ते चांगल्या फळाची तुलना चांगल्या कृती आणि चांगल्या वृत्तीशी करते ज्या देवापासून येतात.

ते कापण्यात येईल व अग्नीत टाकण्यात येईल

ह्याचा अर्थ, “न्याय करण्यात येईल व देवाकडून शिक्षा मिळेल.”

योहानाने पूर्ण केले

म्हणजे, “योहान करीत होता” जसे संदेष्ट्याने सांगितले होते की देवाचा दूत करील.

पाहा

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल “लक्ष द्या आणि पाहा” किंवा “इकडे लक्ष द्या!”

माझा दूत

म्हणजे, “मी, परमेश्वर, माझा दूत पाठवील.” कांही भाषांमध्ये ह्या वाक्यासाठी अप्रत्यक्ष उल्लेख केल्यास जास्त नैसर्गिक वाटेल, उदा. “जसे यशह्या संदेष्टह्याने सांगितले होते की देव आपला दूत पाठवील.”

तुझ्यापुढे

ह्या वाक्यांशामध्ये “तुझ्या” हा शब्द मशीहाशी संबंधित आहे.

तुझा मार्ग तह्यार करील

देवाचा दूत लोकांनी मशीहाचे ऐकावे म्हणून त्यांना तह्यार करील.