mr_obs-tn/content/24/01.md

1.7 KiB

अरण्य

म्हणजे, “वाळवंट” किंवा, “वस्तीपासून दूर, वाळवंटासारखा प्रदेश.” त्या भागात फार थोडे लोक राहात असत.

रानमध

हा मध रानात मधमाशांनीच नैसर्गिकरित्या तह्यार केलेला असे; हा मनुष्याने तह्यार केलेला नसे. जर “मध” ह्या शब्दाने लोकांना ते समजत असेल तर मग “रान” हा शब्द म्हणण्याची गरज नाही.

टोळ

हे मोठे, उड्या मारणारे पंख असलेले किटक होते, मोठ्या नाकतोड्यासारखे. कांही लोक जे वाळवंटात राहातात ते हे खातात.

उंटाचे केस

उंट एक प्राणी आहे त्याचे केस फार खरबरीत असतात. लोक त्याचे कपडे बनवीत असत. ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल “प्राण्याचे खरबरीत केस.”

उंटाच्या केसापासून बनविलेले कापड

म्हणजे “उंटाच्या केसापासून बनविलेले खडबडीत कापड.” अरण्यात इतर कपड्याप्रमाणे ही कपडे लवकर फाटत नसत.