mr_obs-tn/content/23/09.md

1.7 KiB

कांही दिवसानंतर

येशूच्या जन्मानंतर किती दिवसापूर्वी ज्ञानी लोकांनी तारा पाहिला हे स्पष्ट समजत नाही, पण प्रवासाची तह्यारी करुन बेथलहेमपर्यंत पोहोंचायला त्यांना दोन वर्षे लागली असतील.

ज्ञानी लोक

हे “ज्ञानी” लोक बहुधा फलज्योतिषी असतील जे ग्रहताऱ्याचा अभ्यास करतात. त्यांना जुन्या करारातील संदेष्ट्यांनी लिहिलेल्या लिखाणाची माहिती असावी त्यात मशीहाच्या जन्माविषयी भविष्य लिहिले होते.

विशेष तारा

जो तारा त्यांनी पाहिला होता तो सामान्य तारा नव्हता. तो येशूच्या जन्माच्या वेळीच दिसला.

त्यांनी ओळखले

कांही भाषा अशी भर घालू शकतात, “त्यांच्या अभ्यासातून, त्या ज्ञानी लोकांनी ओळखले.”

घर

तो जेथे जन्मला त्या प्राण्यांच्या ठिकाणी तो आता राहात नव्हता.