mr_obs-tn/content/23/07.md

2.1 KiB

(तो देवदूत पुढे बोलतो.)

बाळंत्यात गुंडाळलेले

त्यावेळच्या रितीप्रमाणे नविन जन्मलेल्या बाळाला एका लांब असलेल्या कपड्यात चांगले घट्ट रितीने गुंडाळून ठेवीत. असे म्हणणे आवश्यक होईल की, “नेहमीच्या पद्धतीप्रमाणे लांब कपड्यात गुंडाळलेले.”

गव्हाणी

म्हणजे, “प्राण्यांची चारा खाण्याची जागा.” 23-05 मध्ये तुम्ही काय भाषांतर केले आहे तेही पाहा.

देवदूतांनी भरुन गेले

ह्याचा अर्थ तेथे पुष्कळ देवदूत होते इतके की जणु कांही आकाश भरुन गेले आहे.

देवाला गौरव

ह्याचे असे सुद्धा भाषांतर करता येईल, “चला आपण सर्व मिळून देवाला गौरव देऊह्या!” किंवा, “आपला देव सर्व गौरव व मान घेण्यास योग्य आहे!” किंवा, “आपण सर्वजण देवाचे गौरव करु!”

पृथ्वीवर शांति

दुसऱ्या पद्धतीने म्हणावह्याचे झाल्यास असे म्हणता येईल, “पृथ्वीवर शांति असो.”

मनुष्यांवरती कृपा

ह्याचे भाषांतर असे करता येईल, “ज्या लोकांकडे तो कृपेने, आनंदाने, किंवा सदिच्छेने पाहातो.”