mr_obs-tn/content/23/06.md

1.4 KiB

त्यांचे कळप राखीत होते

“कळप” म्हणजे मेंढराचा समूह. मेंढपाळ आपली मेंढरे सांभाळीत होते, आणि त्यांना काही उपद्रव होऊ नये किवा चोरानी नेऊ नये म्हणून त्यांची राखण ते करीत होते.

तेजस्वी देवदूत

ह्याचे असे भाषांतर होऊ शकेल, “देवदूत ज्याच्या अवतीभोवती मोठा प्रकाश दिसतो.” त्या काळोख्या रात्रीत तो चमकणारा प्रकाश अजूनच प्रकाशमान दिसला असेल.

ते घाबरले

देवाचा देवदूत दिसणे ही काही सामान्य गोष्ट नाही त्यामुळे ते खूप घाबरले.

भिऊ नका

बहुतेकदा ह्याचा अर्थ, “भिण्याचे थांबवा.” मेंढपाळ देवदूताला पाहून खूप घाबरले म्हणून तो त्यांना म्हणतो भिण्याचे कारण नाही.