mr_obs-tn/content/23/01.md

2.4 KiB

त्याला माहित होते हे बाळ त्याचे नव्हते

म्हणजे, “त्याला माहित होते की त्याने तिला गरोदर केले नव्हते.”

मरीयेला लाजवणे

म्हणजे, “लोकांमध्ये तिचा अपमान करणे” किंवा “लोकांमध्ये तिला लज्जीत करणे.” योसेफाने मरीयेला दह्या दाखवली, जरी ती व्यभिचारी आहे असे वाटत होते तरी.

तिला गुप्तपणे घटस्फोट द्यावा अशी त्याने योजना केली

ह्याचे असेही भाषांतर होऊ शकेल, “कोणाला काही कारण न सांगता घटस्फोट देण्याची योजना केली,” किंवा, “कोणाला तिच्या गरोदरपणाविषयी न सांगता तिला घटस्फोट देण्याची योजना केली.” कारण योसेफ न्यायी होता, शक्यतो ही परिस्थिती चांगल्या रितीने सोडवावी असे त्याला वाटत होते, त्यांच्या संस्कृतीमध्ये गूपचूपरित्या घटस्फोट देणे ठीक होते.

तिला घटस्फोट देणे

कांही भाषांमध्ये हे म्हणणे अधिक योग्य होईल, “साखरपुडा मोडणे / वाग्दान रद्द करणे.” योसेफ व मरीह्या यांचे वाग्दान झाले होते किंवा, “लग्नाचे वचन देण्यात आले होते.” पण यहूदी संस्कृतीमध्ये वाग्दान मोडण्यासाठी घटस्फोट आवश्यक होता.

स्वप्नात

म्हणजे, “तो झोपलेला असतांना आणि स्वप्नात असतांना.”