mr_obs-tn/content/22/04.md

1.8 KiB

सहा महिन्यांची गरोदर

एकतर ती गरोदर होऊन सहा महिने झाले असतील किंवा तीला सहावा महिना चालू असेल.

गरोदर

गरोदरपणाविषयी वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे वाक्प्रचार वापरतात, उदा.”तिच्या पोटात बाळ होते” किंवा, “तिच्या पोटात सामावले होते” किंवा “ती पोटाशी होती.” काही भाषांमध्ये ह्याविषयी विशेष रितीने सभ्यतेने बोलले जाते, उदा. तिला दिवस गेले होते. असे शब्द वापरा की वाचणाराला लाज वाटू नये.

अलीशिबा

ती जखऱ्याची बायको होती. देवदूताने जखऱ्याला सांगितले की अलीशिबा एका मुलास जन्म देईल.

अलीशिबेची नातलग

पुष्कळ भाषांतरांमध्ये “चुलत बहिण” म्हटले आहे पण आपल्याला माहीत नाही की ह्या दोन स्त्रियांचे नाते नक्की काय होते. आपण “नातलग,” “नातेवाईक,” किंवा, “चुलत बहिण” असे सर्वसाधारण शब्द वापरु शकतो.

वाग्दान झाले

म्हणजे, “वचन दिले.”