mr_obs-tn/content/21/11.md

1.9 KiB

विनाकारण द्वेष केला व नाकारले

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल की “जरी त्याने कांही वाईट केले नव्हते तरी त्याचा द्वेष केला व त्याला नाकारले” किंवा “...जरी तो निरपराध होता.”

अगोदर सांगितले

म्हणजे ज्या गोष्टी भविष्यात घडणार होत्या त्याविषयी त्यांनी आधीच सांगितले होते. ह्याच्या सारखाच अर्थ असणारे दुसरे शब्द, “सांगून ठेवले होते” आणि “भविष्य केले होते” हे आहेत.

त्याच्या कपड्यावर चिठ्ठह्या टाकल्या

म्हणजे, “कोण ती कपडे जिंकेल हे निश्चित करण्यासाठी एक संधीचा खेळ खेळणे.”

जखऱ्या

जखऱ्या हा जुन्या करारातील एक संदेष्टा होता बाबेल येथे धरुन नेलेले लोक जेव्हा वचनदत्त भूमीत परत येतात तेव्हा हा देवाच्या लोकांशी बोलला हे मशीहा येण्याअगोदर साधारण 500 वर्षापुर्वी झाले.

तीस चांदीची नाणी

त्यावेळेस, ह्या एका नाण्याची किंमत एका माणसाच्या चार दिवसाची कमाइ इतकी होती.