mr_obs-tn/content/21/05.md

2.7 KiB

यिर्मह्या संदेष्ट्याद्वारे देवाने अभिवचन दिले

ह्याचे असेही भाषांतर करता येईल, “देवाने यिर्मह्याला जो संदेश दिला त्याद्वारे देवाने अभिवचन दिले” किंवा, “यिर्मह्या संदेष्ट्याने लोकांना देवाचे अभिवचन सांगितले.”

पण त्याप्रमाणे नाही

नवा करार खरोखर परिणामकारक असणार आहे. लोक देवाला खरोखर ओळखतील, ते खरोखर त्याचे लोक म्हणून जगतील, आणि तो त्यांचे पाप पुर्णपणे क्षमा करील, मशीहाने स्वतःचे जे अर्पण एकदाच केले त्या आधारावर व जे सर्व त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना ही पापक्षमा मिळते.

लोकांच्या हृदह्यावर त्याचे नियम लिहिल

ही एक उपमा आहे त्याचा अर्थ, “त्याच्या लोकांना त्याचे नियम समजण्यास मदत करील आणि मनापासून ते पाळण्याची इच्छा देईल.” शक्य असेल तर, हृदह्यावर लिहिण्याची कल्पना येणारे चित्र त्यांच्यासमोर ठेवा, देवाने इस्राएल लोकांसाठी दगडी पाट्यांवर नियम लिहिले तसे हे नाही. ते शक्य नसेल तर, तुम्ही फक्त भाषांतर करुन अर्थ सांगा.

त्याचे लोक व्हा

ह्याचे भाषांतर असे होऊ शकते, त्याचे विशेष लोक व्हा.” किंवा, “त्याचे कृपा पावलेले लोक व्हा.”

नवा करार सुरु करा

म्हणजे, “नव्या कराराचा परिणाम सुरु होण्याचे तुम्ही एक कारण बना” किंवा, “त्याच्या लोकांकडे नवा करार आणा.”