mr_obs-tn/content/21/01.md

1.5 KiB

अगदी सुरुवातीला

म्हणजे, पृथ्वीला प्रथम निर्माण केले तेव्हापासून.

सापाचे डोके फोडणे

विषारी सापाचे डोके फोडल्याशिवाय विष जात नाही, नाहीतर तो कुणालाही इजा करु शकतो. “फोडणे” ह्या शब्दासाठी असा शब्द वापरा की त्याच्याकडून असे समजेल की डोक्याचा नाश झाला.

हा साप...सैतान होता

सैतान सापाच्या स्वरुपात हव्वेशी बोलला. ह्याचा अर्थ असा नाही की तो आता साप आहे. त्याचे असेही भाषांतर होऊ शकेल, “साप...सैतानाच्या स्वरुपात होता.”

हव्वेला कोणी फसवले

म्हणजे, “हव्वेशी कोण खोटे बोलला.” देवाने हव्वेला जे सांगितले होते त्या विषयी तिला संशय येईल व ती देवाची आज्ञा मोडील अशा प्रकारे तो तिच्याशी लबाड बोलला.