mr_obs-tn/content/20/11.md

2.0 KiB

सत्तर वर्षांनंतर

बाबेलोनी सैन्याने यरुशलेमच्या लोकांना बंदिवासात धरुन नेले होते त्याला सत्तर वर्षाचा काळ लोटला हे या शब्दाने सुचित होते.

कोरेश

कोरेशाला, "महान कोरेश" असेही म्हणत. "कोरेश" या नावाचा अर्थ पर्शियन भाषेत "सूर्यासारखा" असा होतो. परंतु, कोरेश हा ऐतिहासीकदृष्टया फार महत्वाचा माणूस होता, म्हणून त्याच्या नावाच्या अर्थाचे भाषांतर करण्यापेक्षा त्याच्या नावाचाच उल्लेख केलेला बरा.

पारस

पारसाचे राज्य मध्य आशिया पासून ते मिसर देशापर्यंत पसरलेले होते. त्याचे घर सध्याचा इराण आहे तेथे सर्वसामान्य भागात होते.

इस्राएल लोकांना आता यहूदी म्हणू लागले होते

याचे असे सुद्धा भाषांतर होऊ शकेल, "लोक आता इस्राएली लोकांना 'यहूदी' या नावाने संबोधु लागले होते. '"

यहूदाचा देश

म्हणजे, पाडावापुर्वी यहूदाचे राज्य ज्या ठिकाणी होते ती जागा. यरुशलेम शहर ही यहूदाची राजधानी होती.