mr_obs-tn/content/04/04.md

2.5 KiB

शेकडो वर्षानंतर

हे असे भाषांतरित केले जाऊ शकते, बाबेल येथे विविध भाषांमध्ये लोकांचे विभाजन करण्यात आल्यानंतर अनेक पिढ्यानंतर, किंवा,” ते घडल्यानंतर अनेक वर्षांनी.

आपला देश सोड

हे तो प्रदेश दर्शविते जेथे अब्रामाचा जन्म झाला आणि तो मोठा झाला होता, (मध्य आशियातील एक प्रदेश ज्याला “ऊर” म्हणतात). तो, “मूळ प्रदेश”, “जन्मभुमी” किंवा तत्सम काहीतरी म्हणून अनुवादित केले जाऊ शकते.

आणि कुटुंब

“देवाने अब्रामाला पाचारण केले की सर्व नातेवाईक सोडून ये. तथापि, देव अब्रामाला ज्या लोकांची जबाबदारी आहे ज्यात त्याच्या पत्नीचा समावेश आहे त्यांना सोडूण्यास सांगत नाही.

तुझे एक मोठे राष्ट्र निर्माण करेन

देव अब्रामाला अनेक संतान देणार, आणि ते एक मोठे आणि महत्त्वाचे राष्ट्र किंवा देश होईल.

तुझे नाव मोठे करेन

याचा अर्थ अब्रामाचे नाव आणि त्याचे कुटुंब जगात सुप्रसिद्ध होईल, आणि लोकांना त्यांच्या विषयी चांगले वाटेल.

पृथ्वीवरील सर्व कुटुंबे

अब्रामाने देवाच्या मागे चालण्याच्या निर्णयामुळे फक्त त्याचे स्वत: चे कुटुंब नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक वंशांच्या कुटुंबांवर परिणाम होईल.